पानसरे-कडवकर यांच्यात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:36 IST2017-09-09T00:36:19+5:302017-09-09T00:36:19+5:30
खा.राहुल गांधी यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजुस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला.

पानसरे-कडवकर यांच्यात वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खा.राहुल गांधी यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजुस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला.
या संदर्भात बोलताना तहसीलदार कडवकर म्हणाले की, व्यासपीठाच्या पाठीमागे असताना पोलीस कर्मचाºयाने आपणास ओळखपत्र विचारले, आपण ते दाखविले. तेव्हा त्या कर्मचाºयाने आत जाण्यास सांगितले. शिवाय राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या अधिकाºयांनीही आतमध्ये जाण्यास परवानगी दिली; परंतु, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपणास आत जाण्यापासून मज्जाव केला. त्यांना ओळख सांगून ओळखपत्र दाखवूनही ज्यांनी ओळखपत्र दिले, त्यांच्याशी बोला, असे सांगून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली व शर्टला धरुन तेथून बाजुला काढले. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार असल्याचे कडवकर म्हणाले.
याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तहसीलदार कडवकर हे मूळातच सभास्थळी उशिरा आले. व्हीव्हीआयपींसाठी असलेल्या व ज्या मोजक्याच पदाधिकाºयांना राहुल गांधी यांच्या सोबत व्यासपीठावर जायचे होते, त्यांच्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारातून कडवकर जाण्याचा प्रयत्न करु लागले. जात असताना इतर दोन-तीन जणांना ते पदाचा दूरुपयोग करुन घेऊन जात होते. त्यामुळे त्यांना याबाबत विचारणा केली.
राष्ट्रीय सुरक्षा अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचे एक नायब तहसीलदार दंडाधिकारी म्हणून उपस्थित असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना त्या प्रवेशद्वारातून जाता येणार नाही, असे सांगितले. मी ही वरिष्ठ अधिकारी असल्याने इतर अधिकाºयांशी कसा संवाद साधावा, याबाबतचे तारतम्य आपणास आहे. त्यामुळे त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही. ते खोटं बोलत आहेत, असे पानसरे म्हणाले.
दरम्यान, दोन वरिष्ठ अधिकाºयांमधील वादाच्या या घटनेमुळे उपस्थित महसूल व पोलीस कर्मचारीही चांगलेच चकित झाल्याचे पहावयास मिळाले. या संदर्भात जिल्हा कचेरीत महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाºयांची बैठकही झाल्याचे समजते.