तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 21:54 IST2019-05-24T21:54:34+5:302019-05-24T21:54:42+5:30
तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल
वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालवून दुसऱ्या दुचाकीस धडक देऊन एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकाविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम आसाराम पवार (४१ रा. कनकोरी ता.गंगापूर) व त्यांचा मित्र मदन माणिक पवार हे १२ मे रोजी चितेगाव येथे लग्नासाठी गेले होते. तेथून दोघेही दुचाकीने (एम.एच.२०, ए.व्ही.४५७३) औरंगाबाद-नगररोडने कनकोरी गावाकडे जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जिकठाण फाट्यावर वळण घेत असतांना नगरकडून औरंगाबादच्या दिशने जाणाºया दुचाकीने (एम.एच.२०, एफ.एफ.८२५७) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तुकाराम पवार व मदन पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मदन पवार याचा १४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुकाराम पवार याने वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन दुचाकीस्वाराविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.