विजेच्या धक्क्याने शिक्षिका देवंग्रे यांचा मृत्यू

By Admin | Updated: April 30, 2017 23:51 IST2017-04-30T23:48:03+5:302017-04-30T23:51:37+5:30

शिरुर अनंतपाळ : शिक्षिका भाग्यश्री व्यंकटराव देवंग्रे (४२) यांचा शनिवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

Death of teacher Devangre by electric shock | विजेच्या धक्क्याने शिक्षिका देवंग्रे यांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शिक्षिका देवंग्रे यांचा मृत्यू

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका भाग्यश्री व्यंकटराव देवंग्रे (४२) यांचा शनिवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. विद्युत मोटार बसवून घराच्या पहिल्या मजल्यावरील सिन्टेक्समध्ये हौदातील पाणी भरताना हा विजेचा धक्का बसला. याबाबत शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानरचनावादी पद्घतीने अभ्यासक्रम राबवून अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरलेल्या आदर्श शिक्षिका भाग्यश्री व्यंकटराव देवंग्रे (४२) या शनिवारी शाळेवरुन दुपारी घरी आल्या. दरम्यान, घराच्या पहिल्या मजल्यावरील सिन्टेक्समध्ये पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार सुरु करताना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना उपचारासाठी शिरुर अनंतपाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ. बालाजी देवंग्रे यांनी घोषित केले. याबाबत शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, दोन भाऊ, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. शिक्षिका भाग्यश्री देवंग्रे यांनी शिक्षण क्षेत्रात सतत २० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of teacher Devangre by electric shock