शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

औरंगाबादेत उपचाराअभावी हिमोफेलियाग्रस्त मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:13 IST

हिमोफेलिया रुग्णांसाठी डे-केअर सेंटर नसल्यामुळे या रुग्णांची उपचाराअभावी परवड होत आहे. उपचारासाठी मुंबईला घेऊन जाताना वाळूज महानगरातील हिमोफेलियाग्रस्त ५ वर्षीय चिमुकल्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

ठळक मुद्देमुंबईला जाण्यास विलंब : औरंगाबादेतील ‘मिनी घाटी’त ‘डे-केअर सेंटर’ला मंजुरी; परंतु रुग्णालयाचेच उद्घाटन रखडलेय...

शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : हिमोफेलिया रुग्णांसाठी डे-केअर सेंटर नसल्यामुळे या रुग्णांची उपचाराअभावी परवड होत आहे. उपचारासाठी मुंबईला घेऊन जाताना वाळूज महानगरातील हिमोफेलियाग्रस्त ५ वर्षीय चिमुकल्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.अनिकेत छबीलदास शिरसे (५, रा.धामोरी खुर्द, ता.गंगापूर) हा हिमोफेलिया आजाराचा रुग्ण आहे. त्याच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, गेल्या काही दिवसांपासून अनिकेतवर पंढरपुरात हिमोफेलिया सोसायटी औरंगाबाद चाप्टरच्या वतीने उपचार सुरू होते. २९ एप्रिल रोजी रविवारी अनिकेतच्या नाका-तोंडातून अचानक रक्तस्राव सुरू झाल्यामुळे घाबरलेले पालक त्यास फॅक्टर-७ चा डोस देण्यासाठी मुंबईला घेऊन निघाले होते.

अहमदनगर येथे हा डोस मिळत असल्यामुळे रात्री पालक नगरच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचले होते; मात्र तेथेही डोस उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर अनिकेतला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला होता. रात्रभर प्रवास करून सोमवारी पहाटे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनिकेतची प्राणज्योत मालवल्यामुळे त्याला वाचविण्याचे पालकाचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यांच्याकडे औरंगाबादला येण्यासाठी पैसेही नव्हते. हा प्रसंग पाहून मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर काळे यांनी त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देत खर्चासाठी काही पैसेही दिले.सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास धामोरी येथे अनिकेतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मराठवाड्यात ६०० हिमोफेलिया रुग्णमराठवाड्यात जवळपास ६०० हिमोफेलियाचे रुग्ण असून, नोंदणी केलेल्या ५२० रुग्णांवर पंढरपुरात हिमोफेलिया सोसायटीतर्फे मोफत उपचार करण्यात येतात.या रुग्णांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या फॅक्टरचे डोस अहमदनगर, नाशिक, मुंबई, अमरावती, ठाणे, सातारा, नागपूर आदी ठिकाणी सुरू असलेल्या डे-केअर सेंटरतर्फे उपलब्ध करून दिले जातात.अपघात अथवा जखम झाल्यास हिमोफेलिया रुग्णांना रक्तस्राव थांबविण्यासाठी या फॅक्टरचा डोस घ्यावा लागतो. या फॅक्टरची किंमत १५ हजारांपासून दीड लाखापर्यंत असल्यामुळे उपचार घेणाºया रुग्णांना या आजारावर मोठा खर्च करावा लागतो.हिमोफेलिया रुग्णांना औरंगाबाद शहरात उपचार मिळून येथे डे-केअर सेंटर सुरू करण्यात यावे, यासाठी हिमोफेलिया सोसायटीचे औरंगाबाद चाप्टरचे अध्यक्ष डॉ.जी. एस. कुलकर्णी व पदाधिकाºयांचा शासनदरबारी गत अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात डे-केअर सेंटर सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, निधीही उपलब्ध करून दिला आहे; मात्र हे रुग्णालयच अद्याप सुरू झाले नसल्यामुळे हिमोफेलियाच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबई-नाशिकच्या फेºया माराव्या लागत असल्याची खंत डॉ.जी.एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शहरात डे-केअर सेंटर त्वरित सुरू करून मोफत फॅक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी अशोक मानकर, विशाल जाधव, रामनारायण धूत, मनीषा धूत, कल्पना मानकर आदींनी केली आहे.डे-केअर सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू -डॉ.भोसलेचिकलठाणा येथील सामान्य रुग्णालयात डे-केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. या सेंटरसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात असून, लवकरच पदभरती केली जाणार आहे. यानंतर प्रशिक्षण देऊन या सेंटरवर हिमोफेलिया रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल