गुजरातच्या एमआरचा लॉजमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:55 IST2017-12-28T00:55:43+5:302017-12-28T00:55:47+5:30
औषधी कंपनीत एम. आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून काम करणाºया गुजरातच्या एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी रात्री कुजलेला मृतदेह लॉजमध्ये आढळून आला.

गुजरातच्या एमआरचा लॉजमध्ये मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औषधी कंपनीत एम. आर. (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून काम करणाºया गुजरातच्या एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी रात्री कुजलेला मृतदेह लॉजमध्ये आढळून आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये तो काही दिवसांपासून मुक्कामी होता.
राकेश हसमुखभाई पटेल (३९, रा. नारोडा, अहमदाबाद, गुजरात) असे मृताचे नाव आहे. क्रांतिचौक पोलिसांनी सांगितले की, पटेल हे मूळचे गुजरातचे रहिवासी आहेत. ते औषधी कंपनीमध्ये एमआर म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या कामानिमित्त नेहमीच त्यांचे शहरात येणे-जाणे असायचे. २२ डिसेंबर रोजी ते नित्याप्रमाणे कंपनीच्या कामानिमित्त शहरात आले होते. तेव्हापासून ते बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. दोन दिवस झाले तरी पटेल रूमबाहेर न आल्याने लॉजमधील कर्मचाºयांना संशय आला. त्यांनी पटेल यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु आतून प्रतिसाद मिळत नव्हता. शिवाय खोलीतून दुर्गंधी येत असल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. दार उघडून पाहिले असता पटेल मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविला. शवविच्छेदन अहवालानंतरच राकेश यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.