पेटवून दिलेल्या इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: September 15, 2015 00:32 IST2015-09-14T23:50:15+5:302015-09-15T00:32:25+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील मसला (खु) येथे पत्नी व मेहुण्याने पेटवून दिलेल्या इसमाचा सोमवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

पेटवून दिलेल्या इसमाचा मृत्यू
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील मसला (खु) येथे पत्नी व मेहुण्याने पेटवून दिलेल्या इसमाचा सोमवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरूध्द तामलवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मसला (खु) येथील राजेंद्र कच्चू वडवराव हा १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वत:च्या घरासमोर थांबला होता. यावेळी त्याची पत्नी वर्षा व मेहुणा (पत्नीचा भाऊ) जगन शेरखाने या दोघांनी राजेंद्र याच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. यात राजेंद्र ५७ टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिसांनी रविवारी पत्नी वर्षा वडवराव व तिचा भाऊ जगन शेरखाने यांना तात्काळ अटक करून तुळजापूर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)