आव्हाना येथे विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By Admin | Updated: February 15, 2016 00:12 IST2016-02-14T23:56:59+5:302016-02-15T00:12:00+5:30
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे एका अनोळखी इसमाचा विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

आव्हाना येथे विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे एका अनोळखी इसमाचा विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्या इसमाची ओळख अद्याप पटली नसून खून की आत्महत्या? याबाबत चर्चेला उधान आले आहे.
आव्हाना येथील समाधान गावंडे यांच्या शेतातील विहिरीत हे प्रेत आढळून आले. गावंडे हे रविवारी सकाळी शेतात गेले असता विहिरीजवळ उग्रवास येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता प्रेत आढळून आले. त्याची पोलिस पाटील व भोकरदन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच उपनिरीक्षक एन. वाय. अंतरप, पोकॉ. सौदंलकर, एस. एस.उगले यांनी घटनास्थळी येवून ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत वर काढले. सदर इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. इसमाची ओळख पटली नाही. सदर इसमाच्या उजव्या हातावर ओम अक्षर नोंदविलेले आहेत.
वय अंदाजे ४० वर्ष असावे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली. (वार्ताहर)
जालना - शहरातील काही ठिकाणच्या डीपी उघड्या आहेत़ त्यामुळे कुठलाही धोका होण्याची भिती नाकारता येत नाही़