रस्ते अपघातात दिवसाआड एकाचा बळी
By Admin | Updated: December 31, 2015 00:55 IST2015-12-31T00:51:23+5:302015-12-31T00:55:22+5:30
गणेश खेडकर , औरंगाबाद शहरात दररोज सरासरी दोन रस्ते अपघात होऊन दिवसाआड एकाचा जीव जातो. ही माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरूनच समोर आली असून, जानेवारी ते नोव्हें

रस्ते अपघातात दिवसाआड एकाचा बळी
गणेश खेडकर , औरंगाबाद
शहरात दररोज सरासरी दोन रस्ते अपघात होऊन दिवसाआड एकाचा जीव जातो. ही माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरूनच समोर आली असून, जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत ५९१ अपघात होऊन तब्बल १४९ जणांचा बळी गेला. ६२४ लोक या विविध अपघातांमध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात सर्वात जास्त ६३ तर एप्रिल महिन्यात सर्वात कमी ४२ अपघात झाले. मार्चमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१ तर फेब्रुवारीत सर्वात कमी म्हणजे ७ जण ठार झाले.
औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जालना रोड, नगर रोड, जळगाव रोड, पैठण रोड यांसह विविध रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड लोड आहे. सतत वाहतूक विस्कळीत होते. दुचाकीचालकांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून वाहन चालवावे लागते. यातून सतत अपघात होतात. अनेकदा हेल्मेट सक्ती करूनही पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. यामुळे दुचाकीचालकांना जीव गमवावा लागतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी महिन्यात ५० अपघात झाले. यात १४ जणांना जीव गमवावा लागला, तर ४८ लोक जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या ५१ होती. यात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ६४ लोक जखमी झाले. मार्च महिन्यात ५८ अपघातांत २१ जणांचा जीव गेला आणि ९५ लोक जखमी झाले.