शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महावितरणच्या दिव्याखालीच अंधार; कार्यालयातील उघड्या वायर्स, लटकणारे स्वीच बोर्ड दुर्घटनेला आमंत्रण देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:05 IST

Mahavitaran News वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महावितरणचेच सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदोन हजार कर्मचाऱ्यांसह वीज ग्राहकांची सुरक्षा धोक्यात

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : ‘विजेचा वापर करताना योग्य काळजी घ्या आणि अपघात टाळा’ अशी जनजागृती करणाऱ्या महावितरणच्या दिव्याखालीच अंधार आहे. कारण जागोजागी चिकटपट्ट्या गुंडाळलेल्या केबल्ससह ‘शॉक’ देण्यासाठी सज्ज असलेल्या उघड्या वायर्स, लटकणारे स्वीच बोर्ड, ट्युबलाईट, तुटलेल्या स्वीच बोर्डमधून डोकावणाऱ्या वायर्स, ही स्थिती महावितरणच्या कार्यालयांचीच आहे. जिल्ह्यामध्ये महावितरणच्या कार्यालयांनाच विजेचे धक्के बसण्याची वेळ ओढवली आहे.

अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकीच वीजही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तिचा जर योग्य वापर झाला नाही, तर अपघाताला आमंत्रण मिळालेच म्हणून समजा. वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महावितरणचेच याकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतर सर्व रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कार्यालयांतील विद्युत यंत्रणेच्या अवस्थेची ‘लोकमत’ने पाहणी केली. या पाहणीत महावितरणच्या कार्यालयांतच अपघाताला आमंत्रण देणारी अवस्था पाहायला मिळाली. छोटासा स्पार्कही धोकादायक ठरू शकतो. परंतु विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारी ज्या कार्यालयांत बसतात, ती मात्र सुसज्ज करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक ऑडिट कोणत्या कार्यालयाचे करायचे, यापूर्वी ते कधी झाले, याची अद्ययावत माहिती महावितरच्या अधिकाऱ्यांकडे नाही. ती घेतली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सूचना करतोकोणत्या कार्यालयास, किती कार्पेट एरियाला इलेक्ट्रिक ऑडिट गरजेचे, याची माहिती घेतली जाईल. कोणत्या इमारतीला हे लागू आहे, हे आधी पाहावे लागेल. जेव्हा जेव्हा मी कार्यालयांना भेट देतो, तेव्हा तात्काळ त्यासंदर्भात सूचना करतो. बहुतांश ठिकाणी चांगली स्थिती आहे. यापुढेही त्याचा आढावा घेतला जाईल.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

ग्रामीण विभाग कार्यालय, चिकलठाणाइमारतीत प्रवेश करतानाच लटकलेला विद्युत बोर्ड, ट्युबलाईट, जुनाट वायरिंग, लोंबकळत आणि जागोजागी चिकटपट्ट्या गुंडाळलेले वायरिंग निदर्शनास पडते. इमारतीची एक-एक पायरी चढताना विद्युत यंत्रणेची अवस्था पाहून अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज मनोमन ‘शॉक’ बसत आहे. कार्यालयातही ठिकठिकाणी वायर्सचे गुच्छे लोंबकळत आहेत.

अधीक्षक अभियंता (स्था) कार्यालय, दूध डेअरी चौकया इमारतीत इतर कार्यालये, वीज बिल भरणा केंद्रही आहे. अभियंत्याच्या कक्षासमोरच दुरवस्था झालेला स्वीच बोर्ड आहे. स्वीच बोर्डमधील विद्युत वायर बाहेर पडल्या आहेत. उघड्या स्वरूपातील वायरला चिकटपट्टी लावण्याचीही कोणी तसदी घेतली नाही. त्यातून कोणालाही विजेचा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहर उपविभाग कार्यालय, चिकलठाणाइमारतीत प्रवेश करताच अधिकाऱ्यांची नावे असलेल्या फलकावरच चिकटपट्टीची ठिगळपट्टी करून अनेक वायर एकत्र केल्याचे निदर्शनास पडते. कार्यालयात काही ठिकाणी विद्युत वायर्स लोंबळकत आहेत. इमारतीच्या बाहेरून जागोजागी वायर्स आणि लोखंडी खिडकीला स्वीच लटकलेला पाहायला मिळतो.

जिल्ह्यात महावितरणची कार्यालये- १३१महावितरणचे अधिकारी-कर्मचारी- २२७७कार्यालयांचा रियालिटी चेक- ६

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादAccidentअपघात