कोळीवस्ती अंधारात, ‘महावितरण’चे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:30+5:302021-02-05T04:09:30+5:30
केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगावजवळील कोळीवस्ती शिवारात वीज पोहोचलीच नसून मागणी करूनही वीजपुरवठा मिळत नसल्याने या शेतवस्तीवरील लोकांना अंधाराचा ...

कोळीवस्ती अंधारात, ‘महावितरण’चे दुर्लक्ष
केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगावजवळील कोळीवस्ती शिवारात वीज पोहोचलीच नसून मागणी करूनही वीजपुरवठा मिळत नसल्याने या शेतवस्तीवरील लोकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
‘कोळी वस्ती अंधारात असून येथील लोकांचे जगणे झाले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच ‘महावितरण’कडून या भागात पोल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांच्या व विद्यार्थ्यांचे जीवनातील अंधार संपणार अशी आशा निर्माण झाली. दोन महिन्यांत पोल उभारून झाले. मात्र, अद्यापही रोहित्र बसविण्यात आले नाही. याबाबत पुन्हा ‘महावितरण’च्या सिल्लोड कार्यालयात खेट्या घालाव्या लागत आहेत. अधिकारीदेखील वेळेवर भेटत नाही. त्यामुळे कोळीवस्तीवरील लोकांना अद्यापही अंधारातच जीवन जगावे लागत आहे.
------------
वनविभागाची परवानगी मिळताच काम पूर्ण होईल
कोळीवस्तीवर वीज नेण्याचे काम सुरू आहे. वनविभागाच्या जागेवरून पोल टाकण्यासाठी त्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. पत्रव्यवहार केलेला असून अद्यापही परवानगी मिळालेली नाही. वनविभागाची परवानगी मिळताच आठ दिवसांत काम पूर्ण होईल.
- सचिन बनसोड, उपअभियंता, महावितरण.
------------------
मोबाईल चार्जिंगसाठी जावे लागते तीन किलोमीटरवर
कोळीवस्तीवरील लोकांना मोबाईल चार्जिग करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी केळगाव गावात जावे लागत आहेत. त्यासाठी तीन किलोमीटर अंतर कापावे लागत आहेत. विद्यार्थांना ऑनलाईन क्लासेससाठी अडचणी निर्माण होत आहेत, असे वस्तीवरील दिलीप सपकाळ, अजय सपकाळ यांनी सांगितले.
-------------
फोटो : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील कोळी वस्तीवरील पोल उभारण्यात आले असून अद्यापर्यत रोहित्र मिळालेले नाहीत.