शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत डिएपी खताचा तुटवडा

By admin | Updated: June 18, 2014 01:42 IST

शिरूर अनंतपाळ : सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा डिएपी खत वापरण्याकडे कल असतानाच ऐन खरीप हंगामाच्या सुरवातीलाच तालुक्यात डिएपी खताचा तुटवडा निर्माण झाला

शिरूर अनंतपाळ : सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा डिएपी खत वापरण्याकडे कल असतानाच ऐन खरीप हंगामाच्या सुरवातीलाच तालुक्यात डिएपी खताचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांना डिएपी खताची प्रतीक्षा लागली असल्याने शेतकरी विविध कृषी सेवा केंद्राच्या दुकानावर खताचा तुटवडा असल्याचाच अनुभव येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादनात मराठवाड्यात अव्वल आला तेव्हापासून तालुक्यातील सोयाबीन लागवडीचे क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत चालले असून, चालू वर्षातील खरीप हंगामात किमान २० हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी केली जाईल, असा निष्कर्ष कृषी खात्याने काढला असून, यासाठी बियाणांबरोबरच खतही जादा लागणार आहे़ डिएपी खताचा वापर केला तर सोयाबीनचे हमखास उत्पादन भरघोस मिळते, अशी धारणा शेतकरी वर्गाची झाली आहे़ यासाठी खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकरी डिएपी खताची खरेदी करण्याच्या प्रयत्नात असून, तालुक्यात असलेल्या विविध कृषी केंद्रावर खेटे घालत आहेत़ परंतु, सद्य:स्थितीत बाजारपेठेत डिएपी खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना या खताची पतीक्षा लागली आहे़
परिणामी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होण्यापूर्वी तालुक्याला डिएपी खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे़ (वार्ताहर)
संपाचा परिणाम़़़
याबाबत येथील बाजारपेठेतील कृषी सेवा केंदाच्या विविध विके्रत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या कामगारांचा संप सुरु असून, संपामुळे खत कंपनीकडून खत उपलब्ध होत नाही़ कामगारांचा संप मिटल्यावर खत उपलब्ध होईल, असेही यावेळी सांगण्यात आले़
डिएपी वापरल्याने विक्रमी उत्पादन मिळते ही शेतकऱ्यांची समजूत दूर करणे गरजचे आहे़ कृषी खात्याच्या वतीने आयोजित बैठकांमध्ये आम्ही समजूत दूर करू, असे तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार, अनंत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़