निवडणूक प्रशिक्षणास ३ कर्मचाºयांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:53 IST2017-09-29T00:53:18+5:302017-09-29T00:53:18+5:30
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाºयांना गुरुवारी मतदान केंद्र हाताळणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षणास तीन कर्मचाºयांनी दांडी मारल्याने कारणे बजावा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तर पाठीमागे बसलेले शिक्षक प्रशिक्षणाकडे दुर्र्लक्ष करीत गप्पातच रंगल्याचे दिसून आले.

निवडणूक प्रशिक्षणास ३ कर्मचाºयांची दांडी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाºयांना गुरुवारी मतदान केंद्र हाताळणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षणास तीन कर्मचाºयांनी दांडी मारल्याने कारणे बजावा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तर पाठीमागे बसलेले शिक्षक प्रशिक्षणाकडे दुर्र्लक्ष करीत गप्पातच रंगल्याचे दिसून आले.
निवडणुकीस २३० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यामध्ये २४६ पुरुष आणि ६ महिला कर्मचाºयांचा समावेश आहे. कर्मचाºयांना कल्याण मंडपम् येथे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. मात्र यादरम्यान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी वगळता एकदम पाठीमागे बसलेले कर्मचारी प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करत गप्पा व मोबाईलमध्ये गर्क असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, प्रशिक्षक एकनाथ कºहाळे, पंडित अवचार यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, शिवाजी खोकले, सचिन राका आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी टी. डी. कुबडे, सुनिल पंजरकर आदींनी परिश्रम घेतले. तर प्रशिक्षणास नियुक्त कर्मचारी उशिरापर्यंत येत होते. निवडणूक रिंगणात सरपंचपदासाठी ३८ तर सदस्यपदासाठी १९० उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, पहिल्या टप्यातील प्रशिक्षण पार पडले. आता ३ आॅक्टोबर रोजी दुसरे प्रशिक्षण आहे.