सखी मंच सदस्यांसाठी डान्स, गाण्यांचा नजराणा
By Admin | Updated: September 27, 2014 23:38 IST2014-09-27T23:38:05+5:302014-09-27T23:38:05+5:30
बीड : ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी सोमवारी बीड येथे सचिन ज्वेलर्स प्रायोजित ‘ये शाम मस्तानी’ या डान्स, गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सखी मंच सदस्यांसाठी डान्स, गाण्यांचा नजराणा
बीड : ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी सोमवारी बीड येथे सचिन ज्वेलर्स प्रायोजित ‘ये शाम मस्तानी’ या डान्स, गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंच सदस्यांसाठी नेहमीच विविध कार्यक्रम घेतले जातात. यावेळीही नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘ये शाम मस्तानी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक सचिन ज्वेलर्स हे आहेत. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी चार ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. सदस्यांनी कार्यक्रमाला येताना ओळखपत्र आणने बंधनकारक असणार आहे. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. नियमांचे पालन करावे. (प्रतिनिधी)