आठ रोमियोंना दामिनी पथकाने दिला हिसका

By Admin | Updated: July 29, 2014 01:10 IST2014-07-29T00:04:38+5:302014-07-29T01:10:00+5:30

भोकरदन : मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने गेल्या दोन दिवसांत भोकरदन शहरात आठ रोडरोमियोंना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

The Damini Squadron gave eight of the Romans | आठ रोमियोंना दामिनी पथकाने दिला हिसका

आठ रोमियोंना दामिनी पथकाने दिला हिसका

भोकरदन : मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने गेल्या दोन दिवसांत भोकरदन शहरात आठ रोडरोमियोंना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी स्थापन केलेले दामिनी पथक शहरात दाखल झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून रोडरोमियोंच्या त्रासाने शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा त्रास होत होता. बसस्थानकामध्येही रोडरोमियोंचा सुळसुळाट सुरू झाला. प्रवेशद्वाराजवळ रिक्षाचालक तसेच काही रोमियो महिला, मुली दिसल्यानंतर टोमणे मारण्याचे काम करत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात दामिनी पथक दाखल झाल्याने रोडरोमियोंमध्ये खळबळ उडाली आहे. या पथकाने दोन दिवस महाविद्यालय परिसर, बसस्थानक, आदी ठिकाणी साध्या गणवेशात आठ रोडरोमियोंना पकडून कारवाई केली आहे.
या पथकाने अटक केलेल्या मध्ये विष्णू तांबडे, अमर चाऊस, राजा चाऊस, राहुल पवार, सुदाम पाटील, परमेश्वर पवार, या रोडरोमियोंना २८ जुलै रोजी पकडून कारवाई केली.
तर दोन दिवस अगोदर दोन रोडरोमियोंविरुद्ध कारवाई केली होती. या कारवाईत पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, दामिनी पथक प्रमुख कमल गिरी, सुरेखा जाधव, मेघा नांगलोद, वंदना म्हस्के, सरोज वाघचौरे, संजीवनी गाढे, सीमा देठे, माधुरी फुके, सुरेश पाटील, महादेव साटोटे, प्रशांत लोखंडे, रामेश्वर सीनकर, संतोष सोनवणे यांच्यासह भोकरदन पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते़ पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगितले की, शहरातील रोडरोमियोंविरूध्द कोणत्याही क्षणी अचानक येऊन दामिनी पथक कारवाई करणार असल्याचे रेंगे यांनी सागिंतले़ (वार्ताहर)
तालुक्यातील मोठ्या गावात शिक्षण घेण्यासाठी परगावी जाणाऱ्या मुलींची छेड काढून त्यांना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक दोन दिवसांपासून मुक्कामी आहे. यात आतापर्यंत १२ रोडरोमिआेंवर कारवाई करण्यात आली. महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आली. शिवाय मोबाईल क्रमांक देऊन थेट तक्रार करण्याचा सल्ला दिला.

Web Title: The Damini Squadron gave eight of the Romans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.