सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम

By Admin | Updated: July 24, 2014 00:14 IST2014-07-23T23:48:39+5:302014-07-24T00:14:17+5:30

अंबड : दामिनी पथकाने सडकसख्याहरींविरोधात उघडलेली मोहीम मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली.

Damini squad squad campaign for the second consecutive day | सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम

सलग दुसऱ्या दिवशीही दामिनी पथकाची मोहीम

अंबड : दामिनी पथकाने सडकसख्याहरींविरोधात उघडलेली मोहीम मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरु ठेवली. मंगळवारी पथकाने शहरातील विविध विद्यालये, महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. कोणी छेडछाड करीत असल्यास थेट दामिनी पथकास संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी काही विद्यार्थिनींनी छेडछाड होत असल्याच्या तक्रारी पथकाकडे केली.
शहरातील बसस्थानकात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दहा सडकसख्याहरींना सोमवारी दामिनी पथकाने बेदम चोप दिला. त्यांना चोप देतानाच त्यांना विद्यार्थिनींच्या पाया पडून पुन्हा अशी चूक करणार नसल्याची शपथ घेण्यास पथकाने भाग पाडले.
सोमवारी दिवसभरात बसस्थानक परिसरात कारवाई केल्यानंतर मंगळवारी पथकाने पाचोड रोड ते शासकीय तंत्रनिकेतन, विविध विद्यालय व महाविद्यालयांच्या परिसराची पाहणी केली.
सोमवारच्या कारवाईमुळे पथकाची चांगलीच दहशत निर्माण झाल्याने पथक शहरात दाखल झाल्याची कुणकुण लागताच शहरातील सडकसख्याहरी बिळात लपून बसले.
पथक प्रमुख कमल गिरी, वंदना मस्के, संजीवनी गाडे, सुरेखा जाधव, सीमा देठे, माधुरी फुके, मेधा नांगलोत, चालक सुरेश पाटील यांच्यासह अंबड पोलीस संदीप कुटे, अलका केंद्रे आदींच्या पथकाने शासकीय तंत्रनिकेतन, ओमशांती अध्यापक महाविद्यालय, ओमशांती विद्यालय व महाविद्यालय, मत्स्योदरी विद्यालय, मत्स्योदरी महाविद्यालय आदी विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विद्यार्थिनीनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मांडाव्यात याकरिता सर्व ठिकाणी पथकाने विद्यार्थिनींशी बंद दाराआड चर्चा केली.
यावेळी विद्यार्थिनींनी रोडरोमियो शहरातील कोणकोणत्या ठिकाणी व कशी छेड काढतात याविषयी सविस्तर माहिती पथकातील सदस्यांना दिली. सोमवारच्या कारवाईमुळे आंनदी झालेल्या विद्यार्थिनी, प्राध्यापिका व शिक्षिकांनी ठिकठिकाणी पथकातील सदस्यांचा उत्स्फूर्तपणे सत्कारही केला. (वार्ताहर)
भ्रमणध्वनी बोर्डावर
पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई करत असून कुठेही छेडछाडीची घटना होत असेल तर विद्यार्थिंनींनी नि:संकोचपणे आपल्याशी भ्रमणध्वनीव्दारे थेट संपर्क साधावा, असे आवाहन आपण केले आहे. तर सर्व विद्यालये, महाविद्यालयांमध्ये ठिकठिकाणी बोर्डवर आपला भ्रमणध्वनी लिहून दिल्याची माहिती पथकप्रमुख कमल गिरी यांनी दिली. कोणीही संपर्क साधल्यास काही वेळातच मदत देऊ, असेही सांगितले.

Web Title: Damini squad squad campaign for the second consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.