भूम तालुक्यात द्राक्ष बागांचे नुकसान

By Admin | Updated: March 31, 2015 00:36 IST2015-03-31T00:08:19+5:302015-03-31T00:36:30+5:30

भूम : तालुक्याच्या काही भागात रविवारी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडला. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात वारा सुटल्यामुळे

Damage of grape gardens in ground tehsil | भूम तालुक्यात द्राक्ष बागांचे नुकसान

भूम तालुक्यात द्राक्ष बागांचे नुकसान


भूम : तालुक्याच्या काही भागात रविवारी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडला. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात वारा सुटल्यामुळे तालुक्याच्या अनेक भागात द्राक्ष बागा झोपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या ज्वारीची खळी चालू असून, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
तालुक्यात २८ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाचे सावट असून, मध्यंतरी हा पाऊस बंद झाला होता. परंतु २९ मार्च रोजी मेघ गर्जनेसह काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच ज्वारी पिकास फटका बसला आहे. शहरात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हलका तर शेकापूर परिसरात सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारे व हलकासा पाऊस झाला. यात अजीज शबीर पठाण यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले. तयार झालेले द्राक्ष पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर द्राक्ष बागेच्या नुकसानीचा महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी संजय स्वामी, तलाठी एन.के. केदार यांनी केला आहे.
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास १५ ते २० मिनिटे हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी आल्या. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणात थंडी निर्माण झाली आहे.
पालेभाज्यांचेही नुकसान
४परंडा : शहासह परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या़ दरम्यान, या पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान होत असून, कांदा पीक, द्राक्ष बागांनाही याचा फटका बसणार आहे़ मागील पंधरा-वीस दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे लहान बालके आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे़

Web Title: Damage of grape gardens in ground tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.