दलित तरुण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात
By Admin | Updated: May 3, 2014 14:48 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:48:32+5:30
बहिणीच्या दलित प्रियकराची हत्या केल्याप्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांमार्फत केली जाणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.

दलित तरुण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात
मुंबई : बहिणीच्या दलित प्रियकराची हत्या केल्याप्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांमार्फत केली जाणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिलच्या रात्री नितीन राजू आगे याचा मृतदेह झाडाला लटकावलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचे वडिल राजू नामदेव आगे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत सचिन गोलेकर (२१) आणि शेषेराव येवले (४२) यांच्यासह ११ जणांना अटक केली आहे. (आणखी वृत्त/हॅलो)