वृक्षदिंडीने गारखेडा परिसर दुमदुमला

By Admin | Updated: July 31, 2014 01:24 IST2014-07-31T01:04:30+5:302014-07-31T01:24:00+5:30

औरंगाबाद : पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण होण्यासाठी ‘लोकमत संस्काराचे मोती ग्रीन किड्स-२०१४’ या उपक्रमांतर्गत

Dakhdoomi of Garcheda campus of trees | वृक्षदिंडीने गारखेडा परिसर दुमदुमला

वृक्षदिंडीने गारखेडा परिसर दुमदुमला

औरंगाबाद : पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण होण्यासाठी ‘लोकमत संस्काराचे मोती ग्रीन किड्स-२०१४’ या उपक्रमांतर्गत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले.
पारंपरिक वेशभूषेतील शालेय विद्यार्थ्यांनी टाळ, ढोल, ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढली. बुधवारी यशवंत कला महाविद्यालयात वृक्षारोपण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटस् आॅफ इंडियाचे अध्यक्ष सीए विजय राठी, कोषाध्यक्ष सीए गिरीश कुलकर्णी, ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष बी.एस. खोसे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पोहनेरकर, डॉ. बाबासाहेब पैठणे, यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे, दीपक मोरे, अविनाश वाहुळे उपस्थित होते.
वृक्षारोपणापूर्वी यशवंत कला महाविद्यालयापासून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी मुलांनी पांढरे कपडे आणि फेटा, तर मुलींनी हिरव्या रंगाचा पोशाख केला होता. सजविलेल्या पालखीत रोपटी ठेवण्यात आली होती. परिसरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या घोषणा दिल्या. यशवंत कला महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून दिंडीचा समारोप झाला.
याप्रसंगी लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक आलोककुमार शर्मा, ज्ञानप्रकाश विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस.पी. जवळकर, सुनील निकम, देस्ले, जोशी, पानसरे, गीता विद्यामंदिरचे भोईटे, ढोके, करडे, के.के. वाहुळे, श्रद्धा खणसे, जयभवानी विद्यामंदिरच्या रेखा पाथ्रीकर एम.पी. राठोड, फोस्टर डेव्हलपमेंट स्कूलचे बी.बी. शिंदे, आर.पी. फिरके, एस.जी. घोडके, ए.के. बोरुडे, डी.डी. अंभोरे, प्रवीण, बोदडे व मैंद यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमतचे उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव यांनी केले. संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचे पंडित डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत आरक, प्रताप शिरसाट, गंगाधर पठाडे, धनराज चव्हाण, शिवप्रसाद यांनी प्रयत्न केले.
सहभागी शाळा
या कार्यक्रमात संस्कार प्रबोधिनी विद्यालय (शिवशंकर कॉलनी), जयभवानी विद्यामंदिर (जय विश्वभारती कॉलनी), गीता विद्यामंदिर (शिवाजीनगर), ज्ञानप्रकाश विद्यामंदिर (गारखेडा परिसर), फोस्टर डेव्हलपमेंट प्राथमिक शाळेचे (शिवाजीनगर) विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग होता.
वृक्षसंवर्धनाचा संकल्प
विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. नागरिकांनी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन या दिंडीद्वारे करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी घेतले लक्ष वेधून...
वृक्षदिंडीत अग्रभागी सजवलेल्या पालखीत रोपे ठेवण्यात आली होती.
पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.
‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘सेव्ह ट्री’ असे संदेश लिहिलेले झाडांच्या आकारातील फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेले हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे पारंपरिक पोशाख लक्षवेधी होते.
विद्यार्थिनींनी डोक्यावर रोपांच्या कुंड्या धरल्या होत्या. विद्यार्थ्यांनी जागृतीपर जोरदार घोषणा दिल्या.
विद्यार्थ्यांची लांब रांग परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
-वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाबरोबर इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
-वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता.

Web Title: Dakhdoomi of Garcheda campus of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.