दुग्ध व्यवसायालाही उतरती कळा !

By Admin | Updated: April 23, 2015 00:49 IST2015-04-23T00:30:21+5:302015-04-23T00:49:43+5:30

बीड: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसयाकडे बघितले जाते. दुधाचे दर व पशुधनावर होणारा खर्च पाहता दुध जोडव्यवसयाचेही तीन तेरा वाजले आहेत.

Dairy business can decline! | दुग्ध व्यवसायालाही उतरती कळा !

दुग्ध व्यवसायालाही उतरती कळा !


बीड: शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसयाकडे बघितले जाते. दुधाचे दर व पशुधनावर होणारा खर्च पाहता दुध जोडव्यवसयाचेही तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे शेतकरी जनावरांना थेट बाजाराचा रस्ता दाखवत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.
शेती उत्पादनात घट झाली तर शेतकरी त्याची कसर दुध व्यवसायातून भरून काढत असत. मध्यंतरीच्या काळात शेती पेक्षा दुग्धव्यवसयातून अधिकचे उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसयावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते. त्याकरीता इतर राज्यातून मुरा, सुरती जातीच्या म्हशी तर जर्श्यां गार्इंची मागणी वाढली होती. दुधाचे उत्पन्न वाढल्यामुळे गावातील गल्ली-गल्लीत दुधडेअरी झाल्या होत्या. यामधून बेरोजगारांना रोजगार आणि शेतकऱ्यांनाही दुधव्यवसयातून भरघोस उत्पादन मिळाले. मात्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेती या मुख्य व्यवसयाबरोबर दुग्ध व्यवसायवरही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. सध्या चाराटंचाई तीव्र जाणवत आहे. त्यामुळे उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून चाऱ्याची आवक केली जात आहे. चाऱ्याचे दर हे पिक उत्पादनापेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बिघडले आहे. अनेक अडचनींमुळे दुग्धव्यवसाय सध्या अडचनीत आला आहे. चाऱ्याअभावी दुधाचे उत्पन्नही घटले आहे. घटत्या उत्पादनाचे दर नेहमीच वाढत असतात मात्र प्रशासनाच्या अवकृपेमुळे बळीराज्याच्या बाबतीत उलटे झाले आहे. दुधाचे व पिकाचे उत्पन्न घटूनही दरही घटले आहेत. गतवर्षी गाईच्या दुधाला प्रतिलीटर २५ तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये दर मिळत होता. यंदा मात्र यामध्ये तफावत वाढली आहे. गाईचे दुध १८ रु लिटर तर म्हशीचे २५ रू असे असताना मात्र पेंड, कळना, शेंगदाणा पेंड, गोळी पेंड, सरकी त्याचबरोबर कडब्याचे दर गगणाला भिडले आहेत.
चाऱ्याअभावी उत्पादनातही घट
दरवर्षी उन्हाळ्यातही दुधाच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून हिरव्या चाऱ्याच्या रुपात कडवळ, मका, घास आदीची लागवड केली जाते. यंदाही मक्याच्या सरासरी क्षेत्राच्या दुप्पटीने लागवड केली आहे. मात्र पाण्याअभावी या चाऱ्याची वाढच खुंटली आहे. तर उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गहन झाल्याने परिणाम दुधउत्पादनावर झाला.(प्रतिनिधी)

Web Title: Dairy business can decline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.