दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर

By Admin | Updated: January 6, 2015 01:09 IST2015-01-06T00:30:22+5:302015-01-06T01:09:16+5:30

बीड : येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ना अधिकारी थांबतात ना कर्मचारी हजर असतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यालयातील पदे रिक्त आहेत.

DadyBahadera due to the office wind | दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर

दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर


बीड : येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ना अधिकारी थांबतात ना कर्मचारी हजर असतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यालयातील पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे सध्या कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी दांडी बहाद्दर असल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात काम घेवून आलेल्याची गर्दी असते. मात्र अधिक्षकांपासून ते शिपायां पर्यंत कोणीच येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून जिल्ह्यातील दारू दुकान, बियरबार, परमीट रूम यांची नियमीत तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र बीडच्या कार्यालयात कार्यरत असलेले प्रभारी अधिक्षकच आठवड्यातून एखाद दुसरा दिवस बीडच्या कार्यालयात येतात. यामुळे इन्पेक्टर नियमीत कार्यालयात थांबून कामे करण्याचा प्रश्नच नसल्याचे चित्र आज तरी बीड च्या कार्यालयात पहावयास मिळते.
जिल्ह्यात २८० परमीट रूम, ७८ देशी दारू तर १५० बिअर शॉपीची दुकाने आहेत़ या दुकानांची तपासणी सातत्याने करणे बंधनकारक आहे़ ही सर्व जबाबदारी संबंधित इन्स्पेक्टरवर असते़ मात्र, याकडे डोळेझाक केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ एवढेच नाही तर दिवसभरातील केलेल्या कामकाजाची दैनंदिनी बनवून महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करणे बंधनकारक आहे़ असे असतानाही दैनंदिनी अहवाल रजिस्टर धूळखात पडले असल्याचे पहावयास मिळते़
याबाबत अधीक्षक व इन्स्पेक्टर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: DadyBahadera due to the office wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.