शहरात सहा रस्त्यांवर होणार सायकल ट्रॅक

By Admin | Updated: June 20, 2016 00:54 IST2016-06-19T23:29:43+5:302016-06-20T00:54:41+5:30

औरंगाबाद : शहरातील सहा रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत.

Cycle track to be on six roads in the city | शहरात सहा रस्त्यांवर होणार सायकल ट्रॅक

शहरात सहा रस्त्यांवर होणार सायकल ट्रॅक

औरंगाबाद : शहरातील सहा रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. याबरोबरच विविध ठिकाणी मोफत सायकल पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रविवारी सांगितले.
इको विंग युथ फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या इंधन मुक्त रविवार अभियानानिमित्त मोंढा नाका येथून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोपप्रसंगी ओम प्रकाश बकोरिया बोलत होते. मोंढा नाका येथे डॉ. अनंत बीडकर व पीईएस महाविद्यालयाचे मोहन सोनटक्के यांनी उद््घाटन केले.
रॅलीत डॉ. राजेंद्र यन्नवार, डॉ. गिरीश डागा, प्रकाश कुलकर्णी, राजेश मानकर, दिलीप आसावे, अस्लम शेख, उत्तम आसवे, तेजस काळे, राहुल दहिभाते आदींचा सहभाग होता. अभियानासाठी आकाश शिंदे, अनंत मोताळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रशांत अवसरमल, जितेंद्र झिरपे, आशिष शिंदे, सी. पी. देशपांडे, डॉ. रमेश बजाज यांनी सहकार्य केले.

Web Title: Cycle track to be on six roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.