शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली गोपनीय माहिती विचारली, १५ मिनिटांत ४ लाख झाले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:05 IST

Cyber Crime: निष्क्रिय बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली फोन करत साडेचार लाख केले लंपास

- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद) : निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँकेत कागदपत्रे जमा केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच सायबर भामट्यांनी खातेदारास फोन करून गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील ४ लाख ५९ हजार रुपये लंपास केल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील देमणी वाहेगाव येथे उघडकीस आली आहे. सतीश पांडुरंग शिंदे असे खातेधारकाचे नाव असून  करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत त्यांनी कागदपत्रे जमा केली होती. 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सतीश शिंदे यांचे औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत बचत खाते आहे. त्यांना २६ मे रोजी संध्याकाळी आपले खाते बंद होणार असून ते सुरु ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करा असा sms ९६४१६२७७८४ या क्रमांकावरून आला. २७ मे रोजी शिंदे यांनी या क्रमांकावर कॉल केला असता त्यांनी खाते नंबर विचारला. त्यामुळे शिंदे यांना शंका आली यांनी बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर चौकशी केली असता त्यांनी खाते नंबर कोणालाही देऊ नका व कागदपत्रे घेऊन बँकेत जाण्यास सांगितले. 

तेव्हा शिंदेही आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत गेले बँकेच्या महिला अधिकाऱ्याकडे कागदपत्र जमा केली. बँकेतून बाहेर निघाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात त्यांना फोनवर संपर्क करण्यात आला. फोनवर समोरच्या व्यक्तीने, तुम्ही पंधरा मिनिटांपूर्वी सपना मॅडमकडे कागदपत्र दिली, मात्र एटीएमची माहिती दिली नाही. त्यामुळे तुमचे खाते सुरु करण्यात आलेले नाही, असे सांगितले. त्यानंतर सायबर भामट्यांनी शिंदे यांच्याकडून संपूर्ण एटीएम क्रमांक व पिन विचारला. त्यानंतर शिंदे कंपनीत कामावर गेले. दरम्यान, खात्यातून  ४ लाख ५९ हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे मेसेज आले. पण मोबाईल गेटवर जमा असल्याने शिंदे यांना ते पाहता आले नाही. रात्री कंपनीतून घरी जाताना मेसेज पाहिल्यानंतर खात्यावरील रक्कम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

या प्रकरणी शिंदे यांनी खाते नंबर , एटीएम नंबर , एटीएम पिन अशी गोपनीय माहिती देऊन चूक केली हे जरी खरे असले. तरी बँकेत दिलेल्या कागदपत्रांची माहिती पंधरा मिनिटात ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टीमला कशी मिळते ? हा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे. या घटनेत संदर्भात शिंदे यांनी पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्या संदर्भात चौकशी देखील सुरू आहे.

वापरात नसल्याने शिंदे यांचे खाते निष्क्रिय होते. त्यांनी मेसेजनंतर कागदपत्रे जमा केली. मात्र, याची माहिती ऑनलाइन गंडा घालणाऱ्या भामट्यांना कशी मिळाली हे सांगता येणार नाही. खाते धारकांनी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. - अंकिता पवार, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, करमाड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम