शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

विद्यापीठाच्या ‘पेट’च्या दुसऱ्या पेपरबाबत उत्सुकता; उद्या होणार की पुढे जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:32 PM

""Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad ‘पेट-१’चा निकाल १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून ते ‘पेट-२’ला पात्र झाले आहेत.

ठळक मुद्देया परीक्षेसाठी विद्यापीठाला किमान ६ हजारांपेक्षा जास्त संगणक, इंटरनेटची जोडणी, बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पेट’चा दुसरा पेपर ऑनलाईन; परंतु परीक्षा केंद्रावर घेतला जाईल, असा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी विद्यापीठाने एक समितीही नेमली आहे. परीक्षा केंद्रे अद्याप निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे ही परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी होईल की पुढे ढकलली जाईल, याबद्दलची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-२) ही ऑनलाइन; परंतु ती आता घरातून न देता विद्यार्थ्यांना केंद्रांवर जाऊन द्यावी लागेल. पेट - १ या परीक्षेस विद्यार्थी घरातून सामोरे गेले होते. यात अनेक गैर प्रकार झाल्याची चर्चा होती. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुद्धा फटका बसल्याचे पुढे आल्याने पेट - २ परीक्षा केंद्रावर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यापूर्वी ‘पेट- २’ ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना घरूनच देता येईल, अशा सूचना ३० डिसेंबर रोजी जारी केल्या होत्या; मात्र आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ही परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर संगणक आणि इंटरनेट सुविधा पुरवण्यात येईल, अशा सुधारित सूचना जारी केल्या आहेत. 

‘पेट-१’चा निकाल १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून ते ‘पेट-२’ला पात्र झाले. आता ही परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नोत्तराची घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे आता बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली असून, या परीक्षेसाठी विद्यापीठाला किमान ६ हजारांपेक्षा जास्त संगणक, इंटरनेटची जोडणी, बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांकडे संगणक, इंटरनेट सुविधा व बैठक व्यवस्थेसंबंधी पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच ‘पेट-२’ कधी घ्यायची ते ठरेल. 

पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांन ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेस (पेट) ४२ विषयांसाठी ११ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. १ फेब्रुवारीस या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ११ हजार १५४ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ६८८ जणांनी मराठीत, तर २८४ संशोधकांनी हिंदी भाषेत ही परीक्षा दिली, तर ५ हजार १८२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पेपर दिला. यातील ११६ जणांना शून्य गुण मिळाले, तर ४ हजार २६३ विद्यार्थ्यांना १ ते ४४.५ टक्क्यांदरम्यान गुण प्राप्त झाले. ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७७५ एवढी आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र