पतीपेक्षा बहिणीचा नवरा बरा....!

By Admin | Updated: June 20, 2016 00:55 IST2016-06-19T23:32:36+5:302016-06-20T00:55:25+5:30

औरंगाबाद : विवाहित मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीच्या नवऱ्यास फूस लावून पळवून नेल्याची घटना शहरातील सिडको भागात घडली.

Cure the husband's husband without the husband ....! | पतीपेक्षा बहिणीचा नवरा बरा....!

पतीपेक्षा बहिणीचा नवरा बरा....!

औरंगाबाद : विवाहित मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीच्या नवऱ्यास फूस लावून पळवून नेल्याची घटना शहरातील सिडको भागात घडली. या घटनेने दोन्ही बहिणींचे संसार मोडकळीस आले असून लहान बहिणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
सिडको एन-७ येथील रहिवासी सुनीता (नाव बदलले आहे) या ४० वर्षीय महिलेचा २० वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. तिचा पती शासकीय सेवेत असून तिला दोन अपत्ये आहे.
तिचा एक मुलगा १८ वर्षांचा आहे. तिची २५ वर्षीय बहीण अनिता (नाव बदलले आहे) शहरातच राहते. पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झालेला आहे. मात्र त्यांना अद्याप अपत्य नाही. तिच्या घरी सुनीताचे सतत येणे जाणे असायचे. यातून सुनीता आणि अनिताचा पती अनिल (नाव बदलले आहे) यांच्या ‘जिजा- साली’च्या गप्पा रंगायच्या.
अनिता माहेरी गेली की, अनिल सुनीताच्या घरी जेवणाच्या निमित्ताने जायचा. यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अनिता माहेरी गेलेली असताना या प्रेमीयुगुलाने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
पंधरा दिवसांपूर्वी अनिल आणि सुनीता घरातून पळून गेले. ही बाब जेव्हा अनिता आणि तिच्या माहेरच्या मंडळींना तसेच सुनीताचा पती आणि मुलांना कळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला.
प्रथम त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत.
सिडको ठाण्यात तक्रार
शेवटी अनिता आणि तिचा भाऊ सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, तेव्हा पोलिसांनी दोघेही स्वमर्जीने गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, अशी भूमिका घेतली.
मात्र अनिताने तक्रार घ्यावी, यासाठी आग्रह कायम ठेवला. तेव्हा पोलिसांनी सुनीता आणि अनिल हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली. शेवटी त्यांना नाशिक येथून शोधून आणण्यात आले. त्यावेळी त्यांनी आम्ही स्वमर्जीने सोबत गेल्याचे पोलिसांना लिहून दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
दोन कुटुंबांचा संसार मोडला...
सुनीता आणि अनिल दोघेही विवाहित आहेत. पहिले लग्न झालेले असताना दुसरीसोबत घरोबा करणे गुन्हा आहे.
शिवाय दुसरे लग्न करण्यापूर्वी एक तर घटस्फोट घेणे आवश्यक असते. दोघांपैकी एक जोडीदार हयात नसेल तर दुसरा विवाह करता येतो.

Web Title: Cure the husband's husband without the husband ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.