शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

शहराची सांस्कृतिक अवकळा, फुटक्या आरशात केला मेकअप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 7:41 PM

शहरावर सांस्कृतिक अवकळा ओढवल्याचे हे चित्र रंगकर्मींना खिन्न करणारे आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : कला, साहित्य, संस्कृती यांची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा सगळ्या जगाला सांगणाऱ्या औरंगाबाद शहरात मात्र बाहेरून येणाऱ्या कलावंतांची चांगलीच परवड होत आहे. नुकत्याच झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान कलावंतांवर चक्क फुटक्या आरशात पाहून मेकअप करण्याची आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहात नाक चिमटीत धरून जाण्याची वेळ आली. मनपाची दोन्ही नाट्यगृहे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरावर सांस्कृतिक अवकळा ओढवल्याचे हे चित्र रंगकर्मींना खिन्न करणारे आहे.

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहरात नुकताच ‘नवा शुक्रतारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन गेला. या कार्यक्रमासाठी अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल दाते, गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे, अभिनेत्री अनुश्री फडणीस, मनीषा निश्चल हे कलाकार शहरात आले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी ग्रीनरूममध्ये तयार होण्यासाठी गेलेल्या कलाकारांना तेथील अवकळा आलेली एके क गोष्ट पाहून आपण ऐतिहासिक नगरी औरंगाबादेत आहोत की अन्य कुठे, असा प्रश्न पडला. येथे धड आरसाही उपलब्ध नव्हता. शेवटी एक फुटका आरसा आम्हाला सापडला आणि त्यात पाहून आम्ही कसाबसा आमचा मेकअप उरकला. आरशापासून ते स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची येथे असुविधा आहे, असे सांगत कलाकारांनी या बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त केली. 

महापालिकेची दोन्ही नाट्यगृहे सध्या बंदावस्थेत आहेत आणि त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची तसूभरही शक्यता नाही. नाट्य व्यावसायिक पवन गायकवाड म्हणाले की, संत तुकाराम नाट्यगृहाच्या खाजगीकरणासाठी मनपाकडून टेंडर काढण्यात आले आहे. यामुळे हे नाट्यगृह कार्यक्रमांसाठी भाड्याने देणे बंद केले आहे. १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या संस्थेला ३ वर्षांसाठी हे नाट्यगृह चालवायला दिले जाईल, असे मनपाकडून सांगण्यात येत आहे; पण ही गोष्ट पूर्णपणे अव्यवहार्य असून, याबाबतीत पुन्हा विचार करावा, असे रंगकर्मींचे म्हणणे आहे. संत एकनाथ रंगमंदिराचे कामकाज जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने मनपाकडून पैशांचा पुरवठा होत नसल्यामुळे काम थांबवले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचा जून महिना उजाडेपर्यंत तरी कलापे्रमींना वाट पाहावी लागणार, असे दिसते. 

नाट्यप्रयोगांसाठी विद्यापीठाचा पर्याय दोन्ही नाट्यगृहांची ही स्थिती आणि खाजगी नाट्यगृहांची कमी आसनक्षमता व न परवडणारे दर यामुळे नाट्य व्यावसायिकांना सध्या थेट विद्यापीठाकडे धाव घ्यावी लागत आहे. मे महिनाअखेरीस आणि नुकतेच २३ जून रोजी विद्यापीठातील नाट्यगृहात दोन मोठी नाटके झाली. या नाट्यप्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नाट्यप्रयोगांसाठी सध्यातरी विद्यापीठाचा पर्याय निर्माण झाला आहे; पण नृत्यसंगीताचे लहान-मोठे कार्यक्रम असल्यास जायचे कुठे किंवा कार्यक्रम सध्या करायचे की नाही, असा विचारही आयोजक करीत आहेत.

टॅग्स :artकलाAurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक