कुकडीची शाळा भरते उघड्यावर
By Admin | Updated: June 21, 2014 00:55 IST2014-06-21T00:20:20+5:302014-06-21T00:55:23+5:30
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पत्रे वादळी वाऱ्याने उडून तीन-चार महिने झाले असले तरी नवीन पत्रे न टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत आहे.
कुकडीची शाळा भरते उघड्यावर
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पत्रे वादळी वाऱ्याने उडून तीन-चार महिने झाले असले तरी नवीन पत्रे न टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर ज्ञानार्जन करावे लागत आहे.
कुकडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेला केवळ दोन खोल्या त्यातील एका खोलीत तर शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवल्या जाते. त्यामुळे एकाच वर्गात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बसविण्यात येते.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या वादळी वारे व गारपिटीत या शाळेवरील टीनपत्रे उडून गेले.
भोकरदनच्या तहसीलदार रुपा चित्रक व ग्र्रामविकास अधिकारी राजेंद्र लोखंडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष अभय देशपांडे यांनी शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहाणी केली होती. गटविकास अधिकाऱ्यांना सांगून व्यवस्था केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले होते. मात्र अद्यापही टीनपत्रे आलेले नाहीत. परिणामत: शाळा उघड्यावर चालवावी लागत आहे. (वार्ताहर)
पत्रव्यवहाराचा परिणाम शून्य
दरम्यान, कुकडी शाळेवरील टीनपत्र्यासंदर्भात जि.प.च्या शिक्षण विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु परिणाम शून्य असल्याचे मुख्याध्यापक कावळे यांनी सांगितले.