शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

आरोग्य विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवात 'सीएसएमएसएस' दंत महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

By राम शिनगारे | Updated: June 16, 2023 20:18 IST

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त महसूल विभागानुसार 'मराठवाडा सर्वोत्कृष्ट महाविद्यालया'चा पुरस्कार सीएसएमएसएस दंत महाविद्यालयाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. महाविद्यालयातर्फे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महसूल विभागनिहाय विविध निकषानुसार सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांची निवड करण्यात आली. त्यात मराठवाड्यातून सीएसएमएसएस दंत महाविद्यालयाने बाजी मारली आहे. त्यात 'नॅक' मूल्यांकनावर आधारित पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेश क्षमता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वार्षिक निकाल, विद्यार्थी कल्याण विभागामार्फत घेतलेले विविध उपक्रम, पायाभूत व शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, अभ्यासोत्तर उपक्रम, शिक्षकांची कामगिरी, संशोधन, पेटंटची नोंदणी, आयएसओ मानांकनासह इतर निषकांचा महाविद्यालयाच्या निवडीसाठी विचार करण्यात आला. त्यात दंत महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी नोंदविल्यामुळे निवड झाली आहे. संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे म्हणाले, मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता अधिक जबाबदारी वाढली असून, रुग्ण व विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थी, प्राध्यापकांची कामगिरीदंत महाविद्यालयातील विद्यार्थीन डॉ. यशश्री देशमुच हीने विद्यापीठ स्तरावर दोन वेळा सुवर्णपदक पटकावले. त्याशिवाय अस्मिता शिंदे, वर्षाराणी नागरगोजे, गितांजली भोसले, मोसमी सय्यदा या विद्यार्थिनीनी विद्यापीठाच्या क्रमवारीत स्थान पटकावले. सहायोगी प्राध्यापक डॉ. ज्योती मगरे यांनी १०२९ ला पेटंट मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, विश्वस्त समीर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद