शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दारूविक्रेत्याची क्रूरता,१०० रुपये चोरीच्या संशयातून युवकाचा खून; कचऱ्यात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:05 IST

कारगिल मैदानाजवळच्या कचऱ्यात एक मृतदेह पडून असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना फोनवरून मिळाली होती.

औरंगाबाद : दारूच्या अवैध अड्ड्यावर काम करणाऱ्या १८ वर्षांच्या युवकाचा १०० रुपये चोरल्याच्या संशयावरून तीन वेळा मारहाण करीत खून केल्याची घटना आनंदनगर येथे बुधवारी रात्री घडली. युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे आरोपीने दुचाकीवर मृतदेह ठेवून कारगिल मैदानाजवळील कचऱ्यात पहाटे फेकला. पुंडलिकनगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शेख अश्फाक ऊर्फ मुक्या शेख अब्दुल (१८, रा. बंबाटनगर) असे मृताचे नाव आहे. शेख मुबारक ऊर्फ बाबा शेख हैदर (३८, रा. आनंदनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कारगिल मैदानाजवळच्या कचऱ्यात एक मृतदेह पडून असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना फोनवरून मिळाली. तेव्हा पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी गेले. मारहाणीच्या व्रणावरून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर विभक्त राहणाऱ्या त्याच्या आईवडिलांना शोधून काढले. तेव्हा घटनेचा उलगडा झाला. मृत मुक्या हा बाबा याच्या अवैध दारूअड्ड्यावर मागील सहा वर्षांपासून कामाला असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यानुसार बाबा यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केल्यानंतर मुक्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे मान्य केले. मुक्या हा सतत पैसे चोरत असल्याचा संशय बाबाला होता. यापूर्वीही त्याने पैसे चोरल्याच्या संशयावरून त्यास मारहाण केली होती. १०० रु. चोरल्याच्या संशयावरून बुधवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी बाबाने मारहाण केली. रात्री लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत एक घाव वर्मी लागल्यामुळे मुक्या जागीच गतप्राण झाला. बाबाने दुचाकीवरून त्याचा मृतदेह कचऱ्यात आणून टाकल्याची कबुली दिल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले.

२७ हजार रुपयांची मागणीमृत मुक्या याच्याकडे बाबाचे २७ हजार रुपये देणे होतेे. ते देण्याची मागणी बाबा त्याच्या वडिलांकडे करीत होता. पैसे देऊ शकत नसल्यामुळे मुक्याला दारूच्या अड्ड्यावर काम करण्यास लावत होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे.

मुलांच्या मैत्रीतून ओढले दारूविक्रीतमुक्याचे आईवडील कामगार असल्यामुळे ते बाहेर असत. मुक्याची बाबाच्या मुलांशी मैत्री होती. त्यातून बाबा याने मुक्याला अवैध दारूविक्रीच्या धंद्यात ओढल्याची माहिती मृताच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शवविच्छेदनानंतर मृत्यू नेमका कशातून झाला, हे स्पष्ट होणार आहे.

...पुन्हा पुंडलिकनगर चर्चेतमागील काही दिवसांपासून पुंडलिकनगर पोलीस ठाणे विविध घटनांमुळे चर्चेत येत आहे. एमपीडीएअंतर्गत कारागृहात असलेला कुख्यात गुंड टिप्या, खुनाच्या घटनेत कारागृहात असलेली तनपुरे गँग, नुकतीच प्रकाशझोतात आलेली दुर्लभ कश्यप गँगच्या कारवायांमुळे पुंडलिकनगर चर्चेत आलेले आहे. अवैध दारूविक्री, दादा होण्याच्या ईर्ष्येतून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद