छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:21 IST2019-07-28T23:21:09+5:302019-07-28T23:21:40+5:30

कामिका एकादशीनिमित्त रविवारी छोट्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Crowds of devotees come to visit in Pandharpur | छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

वाळूज महानगर: कामिका एकादशीनिमित्त रविवारी छोट्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांनी विठुमाऊलीचे दर्शन घेत दुष्काळाचे सावट दूर करण्याची प्रार्थना केली. यावेळी ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला.


कामिका एकादशी निमित्त वाळूज महानगर परिसरातील भाविक विठ्ठल दर्शनासाठी सकाळपासूनच छोट्या पंढरपूरात गर्दी केली होती.

पांडुरंग भक्तीच्या ओढीने विठु नामाचा जप व टाळ-मृदंगाचा गजर करित ग्रामीण भागातून भाविकांचे जत्थेच्या जत्थे पंढरपूरात दाखल होत होते. सकाळी ६ वाजता वाकळे दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक व महाआरती करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

भाविकांची गर्दी व धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपूरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

Web Title: Crowds of devotees come to visit in Pandharpur