इच्छुकांची गर्दी कोणाच्या पथ्यावर?

By Admin | Updated: June 11, 2014 00:22 IST2014-06-11T00:05:30+5:302014-06-11T00:22:16+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लाईन: पाथरी मतदारसंघात अपक्षही असतील दमदार

The crowd of enthusiasts? | इच्छुकांची गर्दी कोणाच्या पथ्यावर?

इच्छुकांची गर्दी कोणाच्या पथ्यावर?

सतीश जोशी, परभणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरीतही इच्छुकांची वर्दळ वाढली आहे़ परभणीनंतर सर्वात जास्त इच्छुकांची संख्या पाथरीमध्ये दिसत आहे़ असे असले तरी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, शिवसेनेच्या विद्यमान आ़ मीराताई रेंगे पाटील यांच्यासह किमान चार ते पाच जण निवडणूक रिंगणात सर्व ताकदीने उतरतील, असा अंदाज आहे़
या मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघाने शिवसेनेला जवळपास २५ हजार मतांची आघाडी दिली होती़ पाथरी मतदारसंघ हा लोकसभेसाठी शिवसेनेला पोषक असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी अनेकवेळा बदल केले आहेत़ लागोपाठ तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेचे हरिभाऊ लहाने यांना २००४ साली पराभवास सामोरे जावे लागले़ राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनी लहाने यांना पराभूत केले होते़ २००९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या मीराताई रेंगे यांनी बाबाजानी यांना सरळ लढतीत जवळपास ११ हजार मतांनी पराभूत केले़ यावेळी इच्छुकांची संख्या वाढली असल्याने मत विभागणीमुळे सर्वांनाच विजयाचा विश्वास वाटतो आहे़ शिवसेनेकडून आ़ मीराताई रेंगे याच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे़ राष्ट्रवादीत मात्र अंतर्गत गटबाजीमुळे स्पर्धा आहे़
पुनर्रचनेत सिंगणापूर मतदारसंघ हा उडाल्यामुळे मागच्या वेळी सुरेश वरपूडकर यांना इच्छा नसतानाही गंगाखेडमध्ये जावे लागले होते़ यावेळी मात्र त्यांनी पाथरीतूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली असली तरी ते पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवितात की अपक्ष म्हणून याबद्दल उत्सुकता आहे़ लोकसभा निवडणुकीपूर्वी राकाँ जिल्हाध्यक्ष विजय भांबळे आणि आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी श्रेष्ठींकडे पाथरीतून राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस केली होती़ यामुळेच सुरेश वरपूडकर नाराज झाले आणि त्यांनी आपली ताकद लोकसभा निवडणुकीत पक्षाला दाखवून दिली़ अपवाद वगळता सुरेश वरपूडकर यांना पक्षाचे तिकीट हे कधीच लाभदायी ठरले नाही़ अपक्ष म्हणूनच ते निवडून आले़ त्यामुळे या निवडणुकीतही ते अपक्ष म्हणूनच उतरतील, असा कयास आहे़
इकडे राष्ट्रवादीकडून सोनपेठ बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर हेही वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत़ परभणी जि़प़तील राकाँचे गटनेते तथा माजी जि़प़ उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांचीही इच्छा पाथरीतून निवडणूक लढविण्याची असली तरी त्यांंना परभणीतून तयारी करण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विटेकर आणि जामकर हे नातेवाईक असल्याने दोघांसमोरही पाथरीसाठी अडचण निर्माण होत आहे़
याशिवाय सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, इंद्राणी मित्रमंडळाचे मोहन फड, माजी आ. हरीभाऊ लहाने यांनीही निवडणुकीसाठी जनसंपर्क वाढविला आहे़ या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे़
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना २५००० एवढे मताधिक्य

Web Title: The crowd of enthusiasts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.