शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांची गर्दी; तरी हरिभाऊ बागडे आघाडीवर

By admin | Updated: August 28, 2014 00:23 IST

औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागलेले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये तिकिटासाठी इच्छुकांनी एकच भाऊगर्दी केली आहे.

औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागलेले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये तिकिटासाठी इच्छुकांनी एकच भाऊगर्दी केली आहे. पक्षातील एकूण १८ जण तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने मतदारसंघात सर्वेक्षण केले असता मतदारांनी हरिभाऊ बागडे (नाना) यांच्याच बाजूने कौल दिला.जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद पूर्व हे तीनच मतदारसंघ भाजपाकडे आहेत. मतदारसंघात तब्बल १८ जण बाशिंग बांधून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. यातील १४ जणांच्या एका गटाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची अलीकडेच औरंगाबादेत भेट घेतली. या भेटीत सर्वांनी एकमुखी मागणी केली की, नवीन चेहऱ्याला संधी द्या. आमच्यापैकी कोणालाही तिकीट दिले तर आम्ही त्याचे मनापासून ‘काम’ करणार...! वरिष्ठ नेतेही अत्यंत चतुर निघाले. त्यांनी चेंडू परत इच्छुकांच्या कोर्टात टाकला. तुम्हीच ठरवा एकाचे नाव. या नावावर आजपर्यंत एकमत झालेले नाही.फुलंब्री मतदारसंघात मागील दोन महिन्यांपासून उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांची संख्या पाहून पक्षनेत्यांनाही धडकी भरली आहे. त्यांनी मुंबईच्या प्रबोधन या संस्थेला पाचारण करून मतदारसंघात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सर्वसामान्य नागरिकांनी पहिली पसंती नाना यांनाच दाखविली. हरिभाऊ बागडे सध्या मतदारसंघात प्रचाराच्या कामालाही जोरदारपणे लागले आहेत. त्यांच्यासोबत देवगिरी बँकेचे संचालक तथा इच्छुक उमेदवार प्रदीप पाटील नेहमी असतात. इतर सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत.हरिभाऊ बागडे यांच्यापाठोपाठ औरंगाबाद महापालिकेत दोनदा महापौर म्हणून काम पाहिलेले आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. भागवत कराडही आघाडीवर आहेत. त्यांनीही मतदारसंघात गाठीभेटी आणि जनसंपर्क वाढविण्यावर अधिक भर दिला आहे.काही उमेदवारांनी तर केंद्रीय आणि राज्याच्या नेत्यांना खाजगीत भेटणेही सुरू केले आहे. जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार नाही. यंदा खाते तरी उघडता यावे म्हणून सर्वांनी फुलंब्रीवर लक्ष केंद्रित केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३३ हजार ५०० मतांची लीड भाजपा उमेदवाराला मिळाली होती.मतदारसंघातील प्रमुख इच्छुक हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड, डॉ. नामदेवराव गाडेकर, सुरेंद्र साळुंके, सुहास शिरसाट, आसाराम तळेकर, एकनाथ जाधव, विकास दांडगे, भाऊसाहेब दहीहंडे, विकास चव्हाण, बापू घडामोडे, तारूअप्पा मेटे, शिवाजी पाथ्रीकर, सदनराव मते.