शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मराठवाड्यातील पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा झाला चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:02 IST

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे; ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. १ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून, पावणेतीन लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे जुलै महिन्यातील पावसाने नुकसान केले आहे. यातील १ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ३५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७५ हजार ९१३, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४२० मि.मी. पाऊस झाला आहे. २५४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६६ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६१ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील ८४ हजार ६९०, तर लातूरमधील ७७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे.

सर्व प्रकल्पांत ७३ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६३, सिध्देश्वर ५०, माजलगाव ३९, मांजरा ३४, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६०, विष्णुपरी ६८, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी