६५ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी नोकरावर गुन्हा
By Admin | Updated: January 4, 2016 00:20 IST2016-01-03T23:47:45+5:302016-01-04T00:20:44+5:30
औरंगाबाद : चष्म्याच्या दुकानात काम करीत असताना खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दुकानातील नोकराविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

६५ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी नोकरावर गुन्हा
औरंगाबाद : चष्म्याच्या दुकानात काम करीत असताना खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दुकानातील नोकराविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना औरंगपुरा भागातील मित्तल आॅप्टीकल येथे घडली.
अनिल सरकटे (रा. समगा, जि. हिंगोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अनिल हा २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत औरंगपुरा येथील आॅप्टीकलच्या दुकानात कामाला होता. या काळात तो मालकासोबत संगणकावरही काम करीत असे. मालकाचा विश्वास संपादन करीत त्याने संगणकात चुकीच्या नोंदी करून ६५ हजार रुपयांचा अपहार केला. ही बाब दुकानमालक नीलेश मित्तल यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरोधात क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड तपास करीत आहेत.