शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

ईश्वर मंझाविरोधात २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 7:08 PM

एका तरुणाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझाने आणखी सहा जणाला नोकरीचे अमिष दाखवून २७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले.

औरंगाबाद : एका तरुणाला नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वरसिंग मंझाने आणखी सहा जणाला नोकरीचे अमिष दाखवून २७ लाख ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात मंझाविरोधात आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा नोंदविला.

याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेच्या अधिका-यांनी सांगितले की, तक्रारदार कल्याण खिरा राठोड(रा. बिडकीन जंगला तांडा,ता.पैठण) हे शेतकरी असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर(डीएमआयसी) प्रकल्पासाठी शासनाने  त्यांची जमिन संपादीत केल्याने जमिनीचा मोबदला म्हणून त्यांना मोठी रक्कम मिळाली आहे. राठोड यांची मुले दीपक आणि राहुल हे पदवीधर असून ते बेरोजगार आहे. २०१४ साली ते अंबड येथील संपत राठोड या नातेवाईकाच्या घरी गेले असता तेथे त्यांनी मुलांच्या नोकरीचा विषय काढला होता. त्यावेळी संपत यांनी त्याच्या ओळखीच्या ईश्वरसिंग मंझा हा विद्यापीठात मोठ्या पदावर असून त्याने अनेकांना नोकरीला लावल्याचे सांगितले. त्यामुळे काही दिवसाने संपत आणि कल्याण राठोड हे विद्यापीठात जाऊन मंझा यास भेटले. तेव्हा त्याने कल्याण यांच्या मुलांचे शिक्षण आणि सध्या ते काय करतात असे विचारले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात त्यांना क्लार्कपदी लावून घेतो, मात्र त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये लागतील असे सांगितले.

यावेळी कल्याण यांनी त्यांचा जावई ज्ञानेश्वर चव्हाण, बबन चव्हाण, पुतण्या सचिन राठोड, भाचा राजेंद्र चव्हाण यांच्याही नोकरीचे काम करण्याचे सांगितले. त्यावेळी मंझा यांनी सर्वांचे ४८ लाख रुपये लागतील असे सांगून यातील जास्तीत जास्त रक्कम दिल्यास नोकरीची आॅर्डर देता येईल असे तो म्हणाला. त्यावेळी कल्याण यांनी टप्प्या टप्याने पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून आणि त्याच्या बँक खात्यातून  सहा जणांच्या नोकरीसाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून १० जून २०१४ रोजी आरोपीच्या विटखेडा येथील घरी ११ लाख रुपये तर १० नोव्हेंबर २०१४ रोजी १६ लाख ५० हजार रुपये नेऊन दिले. तेव्हा दोन महिन्यानंतर नोकरीची आॅर्डर मिळेल असे सांगितले. दोन महिन्यानंतर ते आरोपीला भेटण्यासाठी गेले असता एका प्रकरणात मंझा निलंबित असल्याचे त्यांना समजले.