आॅटोरिक्षाचालकावर गुन्हा

By Admin | Updated: May 27, 2014 00:49 IST2014-05-27T00:45:13+5:302014-05-27T00:49:13+5:30

औंढा नागनाथ : वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आॅटोरिक्षा उलटून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या मृत्यूस कारणीभूत

Crime on the autorickshaw driver | आॅटोरिक्षाचालकावर गुन्हा

आॅटोरिक्षाचालकावर गुन्हा

औंढा नागनाथ : वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आॅटोरिक्षा उलटून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरूद्ध औंढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुरेगाव पाटीजवळ घडली. येहळेगाव सोळंके येथील रहिवासी व विशाखापट्टनम येथे ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरीस असलेला जगन्नाथ सोळंके (वय २१) हा स्वत:च्या लग्नासाठी सुटी घेऊन गावाकडे आला होता. १९ मे रोजी लग्नसोहळा पार पडल्यानंतर घरावर पत्रे टाकण्यासाठी साहित्य खरेदीकरिता तो रविवारी दुपारी औंढा येथे गेला होता. खरेदी केलेले साहित्य व पत्रे आॅटोरिक्षा (क्र.एम.एच.२२ यू-५६३) मध्ये टाकून तो मित्रांसोबत गावाकडे जाण्यास निघाला होता. हिंगोली-परभणी मार्गावरील सुरेगाव पाटीजवळ राजनंदिनी हॉटेलसमोर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने आॅटोरिक्षा उलटला. या अपघातात ‘सीआयएसएफ’चा जवान जगन्नाथ सोळंके यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने औंढा येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी पांडुरंग केशवराव सोळंके यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून आॅटोचालक आरोपी गजानन मारोतराव सोळंके (रा.येहळेगाव सोळंके) याच्याविरूद्ध कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ भादंविनुसार औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime on the autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.