मारहाण प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: April 29, 2015 00:53 IST2015-04-29T00:42:54+5:302015-04-29T00:53:19+5:30

भूम : मागील भांडणाच्या करणावरून तलवार, जांब्या, कुऱ्हाडीने सपासप वार करीत सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

The crime against the four accused in the case | मारहाण प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा

मारहाण प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा


भूम : मागील भांडणाच्या करणावरून तलवार, जांब्या, कुऱ्हाडीने सपासप वार करीत सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चुंबळी येथील शिवशंकर उर्फ समाधान महालिंग गिराम (वय-२७) यांच्यासह प्रभुलिंग त्रिंबक गिराम, संजय प्रभुलिंग गिराम, बसवलिंग त्रिंबक गिराम, संतोष गिराम, महालिंग गिराम यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास गावातीलच चौघांनी मागील भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करीत तलवार, जांब्या, कुऱ्हाडीने हातावर, पोटावर, पाटीवर, मानेवर, मनगटावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले़ या प्रकरणी गंभीर जखमी असलेल्या शिवशंकर गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत मोरे, रणजित मोरे, रामचंद्र मोरे, प्रकाश लेकुरवाळे (सर्व रा़चुंबळी, ता़भूम) या चौघाविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि बी़बी़वडदे हे करीत आहेत़

Web Title: The crime against the four accused in the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.