उपसरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 19, 2015 00:56 IST2015-01-19T00:41:29+5:302015-01-19T00:56:11+5:30
नळदुर्ग : जीवन प्राधिकरणच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपसरपंचासह दोघाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथे घडली़

उपसरपंचासह दोघांविरुद्ध गुन्हा
नळदुर्ग : जीवन प्राधिकरणच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपसरपंचासह दोघाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथे घडली़
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेचे उपअभियंता रमेश ढवळे यांनी नळदुर्ग ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, शिरगापूर येथील ग्रामपंचायतीस शासनाकडून पाणीपुरवठा योजना मंजूर आहे़ या योजनेचे काम सुरू असताना माजी उपसरंच दिगंबर जाधव व उपसरपंच व्यंकट जाधव यांनी संगणमत करून २८ आॅक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत अडथळा आणला़ तसेच सिमेंट टाकीचे सेंट्रींग पाडून नुकसान करीत शासकीय कामात अडथळा आणला़ ढवळे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि सरवदे हे करीत आहेत़ दरम्यान, कामाच्या गुणवत्तेबाबत विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अश्चर्य व्यक्त होत असून, कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)