शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:28 PM

शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देआवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. आवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  

याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मालदार पोलीस ठाण्यात आणि आवडत्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले. बदलीसाठी विनंती करणाऱ्यांपैैकी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बदली मिळावी, अशी विनंती केली. एमआयडीसी वाळूज ठाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागणी गुन्हे शाखेला तर तिसऱ्या क्रमांकाची मागणी वाहतूक शाखेला आहे. यासोबतच दीड पट वेतन मिळणाऱ्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही (बीडीडीएस) चौथ्या क्रमांकाची पसंती आहे.

बॉम्बशोधक आणि नाशक पथकापाठोपाठ एमआयडीसी सिडको, सातारा ठाणे आणि विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालय असा बदलीसाठी पसंती क्रमांक आहे. सतत बंदोबस्त आणि दाखल होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमुळे धावपळीचे ठाणे म्हणून सिटीचौक, क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्याचा उल्लेख होतो, या ठाण्यांत बदलीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे...बदलीसाठी विनंती अर्ज करताना पोलिसांनी विविध कारणे नमूद केले आहेत. शहरातून एमआयडीसी वाळूज ठाण्यात बदली मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यापासून घर जवळ आहे अथवा वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे, अशी कारणे दिली आहेत. विशेषत: आंतरजिल्हा बदलींसाठी प्राप्त अर्जांमध्ये अशी कारणे नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२१ रोजी उडणार बदल्यांचा बारआयुक्तालय प्रशासनाकडे बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानंतर तो बदलीसाठी प्राप्त आहे अथवा नाही, याबाबतची खात्री केली जात आहे. शिवाय त्याने अर्जात केलेल्या विनंती आणि उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ बसविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. २१ एप्रिल रोजी बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या करताना कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली