भुमिगत गटार नालीवरील ढापा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:27+5:302021-02-05T04:10:27+5:30
वाळूजला खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा वाळूज महानगर : वाळूजच्या बाजारतळ परिसरात खासगी कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे ...

भुमिगत गटार नालीवरील ढापा गायब
वाळूजला खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा
वाळूज महानगर : वाळूजच्या बाजारतळ परिसरात खासगी कंपनीच्यावतीने केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे मुख्य रस्त्यावरील व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकाम केल्यानंतर माती रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
जोगेश्वरी नागरी वसाहतीत भंगाराची गोदामे हटवा
वाळूज महानगर : जोगेश्वरीत नागरी वसाहतीत ठिकठिकाणी असलेली भंगाराची गोदामे हटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भंगार विक्रेते या गोदामातील वेस्टेज रॉॅ-मटेरियल्स, पॉलिथीन पिशव्या, लोखंडी व प्लस्टिकचे ड्रम ठेवतात. या भंगार साहित्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरी वसाहतीतील ही भंगाराची गोदामे इतरत्र हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडकोतील पुलाचे काम रखडले
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील गट क्रमांक १५७ व १६६ मधील नैसर्गिक नाल्यावरील पुलाच्या दूरुस्तीचे काम रखडल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहे. पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्याने पुलावर धोकादायक खड्डे पडले आहेत. या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
महावितरणकडून सक्तीने वीज बिलाची वसुली
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात महावितरणकडून सक्तीने वीज बिलाची वसुली केली जात असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगार हिरावला गेल्यामुळे कामगार ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात वीज बिले थकली आहेत. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी वाळूज, रांजणगाव, जोेगेश्वरी, कमळापूर आदी ठिकाणी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी सक्ती करीत असल्याचा आरोप त्रस्त ग्राहकांनी केला आहे.