न्यायालयाच्या आदेशान्वये दोन ग्रामसेवकांसह आठ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: October 25, 2015 23:59 IST2015-10-25T23:40:25+5:302015-10-25T23:59:16+5:30
बदनापूर : तालुक्यातील देवगाव येथील गायरान जमीनीबाबत शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये तात्कालीन दोन ग्रामसेवकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे

न्यायालयाच्या आदेशान्वये दोन ग्रामसेवकांसह आठ जणांवर गुन्हा
बदनापूर : तालुक्यातील देवगाव येथील गायरान जमीनीबाबत शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये तात्कालीन दोन ग्रामसेवकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
तालुक्यातील देवगाव शिवारातील गट नं ६८ मधील गायरान जमीन शासकीय मालमत्ता असताना देखील या जमीनीचे नमुना ८ तयार करून शासनाची व फसवणुक केल्याप्रकरणी सांडु भानुदास जोशी रा फेरण जळगाव ता जि औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून व जेएमएफसी कोर्ट बदनापूर यांच्या आदेशान्वये बाळु लक्ष्मण मगरे,अमजदखॉ मोहमद खॉ,ताराचंद बाबुलाल बरडे,शे जलील शे मुमताज सर्व रा औरंगाबाद,ओम नारायण सिरसाठ वरूडी,बाळु तान्हाजी जाधव रा देवगाव,व्हि डी गायकवाड तात्कालीन ग्रामसेवक,संभाजी कटारे तात्कालीन ग्रामसेवक आदिंवर बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोउपनि चैनसिंग गुसिंगे हे करीत आहेत. (वार्ताहर)