शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागेल: शरद पवार

By स. सो. खंडाळकर | Updated: April 20, 2024 14:00 IST

देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय; शरद पवार यांचे भाकीत

छत्रपती संभाजीनगर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रभावी कार्यक्रम करीत होते. मात्र, केंद्र सरकारवार टिका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्थ करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल, असा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगरात सभेत बोलत होते. 

महाविकास आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खैरे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची सभा श्रीहरी पव्हेलियन येथे आयोजित करण्यात आली होती. दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेस संबोधित केले. पवार म्हणाले, इंडिया आघाडीस अनेक पक्ष साथ देत आहेत. आम्ही सर्व पक्ष मिळून या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय. त्यामुळेच औरंगाबादेतचंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे या दोघांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

.. ते फक्त टीका करण्यात वेळ घालतातमोदी हे देशाचे नव्हे तर केवळ भाजपचे आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय दृष्टिकोण नाही. तुम्ही देशासाठी काय करणार हे सांगितलं पाहिजे. मात्र ते सतत टिका करण्यात वेळ घालवत आहेत. माजी प्रधानमंत्री पंडित नेहरुंवर टिका करणाऱ्या पंतप्रधानांची मानसिकता ओळखा. यांना महागाई कमी करता आली नाही, अशी टीका देखील पवार यांनी केली.

भाजपाकडून सत्तेचा गैरवापरएका सर्वेक्षणानुसार देशात शाळां-महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या बेकारीचं प्रमाण ८७ टक्के आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. राज्यातील फळबागा जळून खाक होत आहेत. मात्र, सरकार याकडे  ढुंकून पाहत नाही. त्यांना चिंता नाही. मग सत्तेचा हे लोक गैरवापर करीत आहेत, असा आरोपही पवार यांनी केंद्र सरकारवर केला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेSharad Pawarशरद पवार