देश परदेश-टॉप टेन पोलीस
By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:04+5:302020-12-04T04:10:04+5:30
टॉप टेन पोलीस ठाण्यात सेकमाई नवी दिल्ली : सरकारने २०२० वर्षात देशातील टाॅप टेन पोलीस ठाणी जाहीर केली आहेत. ...

देश परदेश-टॉप टेन पोलीस
टॉप टेन पोलीस
ठाण्यात सेकमाई
नवी दिल्ली : सरकारने २०२० वर्षात देशातील टाॅप टेन पोलीस ठाणी जाहीर केली आहेत. मणिपूर राज्यातील नाँगपोक सेकमाई हे उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवडले गेले. त्यानंतर तामिळनाडूतील एडब्ल्यूपीएस सुरामंगलम आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील खारसांग पोलीस ठाण्याने या यादीत स्थान मिळवले आहे.
---------------------
प्रसिद्ध कंपन्यांचा
मध भेसळयुक्त
नवी दिल्ली : सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने बुधवारी म्हटले की, भारतात ज्या अनेक मुख्य प्रसिद्ध कंपन्या विकत असलेला मध हा साखरेचा पाक मिसळलेला असल्याचे आढळले आहे. पाहणी केलेल्या मधातील ७७ टक्के नमुने हे साखरेचा पाक मिसळलेले होते.
--------------
पती-पत्नीचा कोरोनाने
एकाच वेळी झाला मृत्यू
मिशिगन (अमेरिका) : पॅट्रिसिया आणि लेस्ली मॅकवॉटर्स या जोडप्याचे कोरोना विषाणूची बाधा होऊन २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.२३ वाजता झाले. ४७ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. ते दोघे नेहमीच एकत्र होते. त्यामुळे त्यांचे एकाचवेळी जाणे हे आम्हाला आश्चर्यकारक वाटले नाही, असे त्यांची मुलगी म्हणाली.
------------------
कोविड रुग्णालयांतून
३५ जणांनी दिली परीक्षा
दक्षिण कोरियात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांसाठीच असलेल्या रुग्णालयांतून गुरुवारी ३५ रुग्णांनी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. ही अतिशय स्पर्धात्मक परीक्षा सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना चांगल्या वेतनाची नोकरी मिळते.
--------------
मंगळावर सहा वर्षांत
पडेल मानवाचे पाऊल
वॉशिंग्टन : येत्या सहा वर्षांत मंगळवार मानवी पाऊल पडलेले असेल, असा मला चांगला आत्मविश्वास आहे, असे एलोन मस्क यांनी म्हटले. मस्क म्हणाले की, मी स्वत: दोन ते तीन वर्षांत मंगळ दौरा करू शकेन. स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अेक्सल स्प्रिंगर म्हणाले की, आम्ही कदाचित चार वर्षांत मंगळावर मानवरहित यान पाठवू शकू.
----------------
चीन-नेपाळचे संबंध
जनतेच्या लाभाचे
बीजिंग : चीन आणि नेपाळ यांच्यातील मैत्री सहकार्य हे कोणत्याही तिसऱ्या देशावर परिणाम करणारे नाहीत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तीने म्हटले. चीन-नेपाळमधील संबंध हे उभय देशांच्या जनतेला लाभदायक आहेत, असेही त्या म्हणाल्या. नुकताच चीनच्या संरक्षणमंत्र्याने नेपाळचा दौरा केला होता.
---------------
चीनमधील कापूस
उत्पादने अमेरिकेत बंदी
वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनच्या सरकारी मालकीच्या कंपनीच्या कापूस उत्पादनाच्या आयातीवर बुधवारी बंदी घातली आहे. ही कंपनी स्थानबद्ध केलेल्या उइघूर मुस्लिमांचा वापर गुलाम म्हणून करीत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे.
---------------