देश परदेश- अल्पवयीन मुलीवर
By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:02+5:302020-12-04T04:10:02+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : अल्पवयीन मुलीवर (१२) येथील मोरना खेड्यात बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एकाला ...

देश परदेश- अल्पवयीन मुलीवर
अल्पवयीन मुलीवर
बलात्काराचा प्रयत्न
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : अल्पवयीन मुलीवर (१२) येथील मोरना खेड्यात बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून एकाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. बुधवारी सायंकाळी मुलगी लग्न समारंभाला गेली असताना आरोपीने तिला जवळच्या उसाच्या शेतात नेले व अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यावर ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
----------------
राजौरी जिल्ह्यात
जिवंत हँड ग्रेनेड
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गुरुवारी जिवंत हँड ग्रेनेड सापडला, असे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या निश्चित माहितीवरून पोलिसांच्या तुकडीने गुज्जर मंडी आणि खेवोरादरम्यान रस्त्याच्या बाजूला ठेवलेला बाँब सापडला.
----------------
तीन अधिकाऱ्यांना लाच
घेताना झाली अटक
जयपूर (राजस्थान) : भिलवाडा जिल्ह्यात कंत्राटदाराकडून गुरुवारी एक लाख रुपयांची लाच घेताना अर्बन इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
--------------------
बोअरवेलमध्ये पडलेला
मुलगा मृत्युमुखी
महोबा (उत्तर प्रदेश) : येथील बुधाउरा खेड्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला १८ तास प्रयत्न करूनही वाचवता आला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. बोअरवेलमधून त्याला गुरुवारी काढून सकाळी रुग्णालयात जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धनेंद्र ऊर्फ बाबू बुधवारी खेळताना दुपारी २.३० वाजता बोअलवेलमध्ये पडला होता.
----------------
दोन हजारांची लाच
घेताना दोघांना अटक
अहमदाबाद : मोडासा (जिल्हा अरवल्ली) गावात दोन हजार रुपयांची लाच घेताना टाऊन प्लॅनर आणि मध्यस्थाला गुजरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. मान्यताप्राप्त नकाशा मिळण्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीला ही लाच मागण्यात आली होती. टाऊन प्लॅनर किरीट रावल हा वर्ग-१ अधिकारी आहे.
--------------------
दोन गटांत संघर्ष,
चार जण जखमी
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : येथील चोरावाला खेड्यात महिलेला त्रास दिला जात असल्यावरून दोन गटांत बुधवारी झालेल्या वादात चार जण जखमी झाले, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. प्रवेश, नवीन, दीपक आणि ओमवती, हे यात जखमी झाले.
------------------
भारत-बांगलादेशात
सीमा बोलणी २२ पासून
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा विषयावरील महासंचालक स्तरावरील चार दिवस चालणारी बोलणी या महिन्यात २२ तारखेला गुवाहाटीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. वर्षातून दोनदा होणारी ही बोलणी प्रथमच दिल्लीबाहेर होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
----------------
बालविवाह रोखण्यासाठी
भरतपूर जिल्ह्यात प्रयत्न
जयपूर (राजस्थान) : भरतपूर जिल्ह्यातील पोलीस आणि बालक संरक्षण संघटनेने बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांना महिला आणि मुलींशी थेट संवाद साधता यावा यासाठी एक पद्धत तयार केली आहे. संघटनेच्या अंगण ट्रस्टच्या महिला कार्यकर्त्यांची समिती पोलिसांनी पोलीस ठाण्यांत स्थापन केली आहे.
-----------------
जिम्मी लाई यांना
जामीन नाकारला
हाँगकाँग : हाँगकाँगमधील लोकशाहीसाठी झगडणारे वकील आणि मीडिया टायकून जिम्मी लाई यांना भ्रष्टाचार प्रकरणात गुरुवारी जामीन नाकारण्यात आला. हाँगकाँग या निमस्वायत्त शहरात सरकारविरोधात व्यक्त होत असलेला आवाज मोठ्या प्रमाणावर दडपून टाकला जात असताना हा जामीन नाकारण्यात आला. लाई हे ‘ॲपल डेली’ प्रकाशित करतात.
----------------------
बीएसएफने तस्कराला
चकमकीत ठार मारले
कोलकाता : जनावरांचा संशयित तस्कर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात भारत- बांगलादेश सीमेजवळ सीमा सुरक्षा दल आणि तस्करांत झालेल्या चकमकीत मारला गेला. ही माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. बुधवारी पहाटे १५० जणांची टोळी ५०-६० जनावरे तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना ही चकमक उडाली.
---------------