देश परदेश- जानेवारीपासून शाळा अंशत: सुरू करण्यास पत्र
By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:06+5:302020-12-04T04:10:06+5:30
अंशत: सुरू करण्यास पत्र नवी दिल्ली : जानेवारी महिन्यापासून शाळा खासकरून १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंशत: सुरू करण्यासाठी परवानगी ...

देश परदेश- जानेवारीपासून शाळा अंशत: सुरू करण्यास पत्र
अंशत: सुरू करण्यास पत्र
नवी दिल्ली : जानेवारी महिन्यापासून शाळा खासकरून १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंशत: सुरू करण्यासाठी परवानगी द्या, असे इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परिषद सचिवांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. दहावी व बारावीचे विद्यार्थी बोर्डची परीक्षा देणार आहेत. ---------------
कोरोनाचे बळी ठरलेल्या
पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणा
नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे ज्या पत्रकारांचा मृत्यू झाला त्यांचा समावेश
‘कोरोना योद्धे’ म्हटले जाणाऱ्यांच्या यादीत करावा आणि त्यांच्या कुटुंबीयांंना तेच लाभ द्यावेत, असे आवाहन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने केंद्र, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.
डॉक्टर्स आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे म्हटले जाते.
पत्रकारांसाठी गट विमा योजनाही राबवावी, असेही पीसीआयने या पत्रात सुचवले आहे.
--------------