शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी मॅनेज होती; मराठवाडा पदवीधरच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजपचा आक्षेप

By सुमेध उघडे | Updated: December 5, 2020 19:26 IST

प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे.

ठळक मुद्देबूथ अधिकाऱ्यांनी सही केलेली व मतपत्रिकांवरील सही अजिबात जुळत नव्हतीमतमोजणीतील २० टक्के मतपत्रिका कोऱ्या होत्या

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी आक्षेप घेतला आहे. प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक विभागीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मतमोजणी केली आहे. अनेक मतपत्रिकांवर एकाच हस्ताक्षरातील पसंती क्रम, मोजणी करताना २० टक्के मतपत्रिका कोऱ्या होत्या असे आक्षेप घेत मोजणी बूथनुसार न करता संपूर्ण मराठवाड्यातील मतपत्रिका एकत्र करून केल्याने यात मोठा घोळ झाला असल्याची तक्रार भाजपने केली असून कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी पहिल्या पसंतीची १ लाख १६ हजार ६३८ मते घेत तब्बल ५७ हजार ८९५ मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मते मिळाली. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय आहे. बोराळकर यांनी आता संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. जवळपास ८० टक्के  बुथकेंद्रातील मतदान झालेल्या मतांपेक्षा जास्त मतपत्रिका किंवा कमी भरलेल्या आहेत, सर्वमतपत्रिका एकत्र केल्यानंतर त्यातील २० टक्के मतपत्रिका कोऱ्या होत्या, बूथ अधिकाऱ्यांनी सही केलेली व मतपत्रिकांवरील सही अजिबात जुळत नव्हती, ७५ टक्के मतपत्रिकांवर सतीश चव्हाण यांच्यासमोर पहिल्या क्रमांकाचा पसंतीक्रम एकाच हस्ताक्षरातील आहे, चव्हाण यांचा पसंतीक्रम असलेल्या मतपत्रिका सलग येत होत्या असे आक्षेप त्यांनी घेतले आहेत. यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे बोराळकर यांनी सांगितले.

अपक्ष उमेदवारांचाही आक्षेप धनदांडग्या राजकीय लोकांनी लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आपल्यासह इतर ५ ते ६ अपक्ष उमेदवारांनी मतमोजणीवर शंका घेतली असून निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. यामुळे सर्वांच्यावतीने कोर्टात याचिका सादर करणार असल्याचे शिरीष बोराळकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद