शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

विधानपरिषद निवडणूक : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी चिकलठाणा परिसरात मतमोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 11:27 AM

आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे.

ठळक मुद्दे कलाग्राम, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले.

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस कलाग्राम, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा पक्षीय स्वरूपाने या निवडणुकीत प्रचार केला गेला.  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून विक्रमी ६१ टक्के मतदान झाले आहे. आज या ६१ टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाले आहे. २०१४ मध्ये पदवीधर निवडणुकीसाठी ३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्यावेळी मतमोजणीच्या ४ फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी ५६ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल, असा दावा यंत्रणा करीत आहे. 

जिल्हानिहाय टक्केवारी :औरंगाबाद ६३.५ जालना ६६.५४परभणी ६७.६४ हिंगोली ६५.५८नांदेड ६४.७ लातूर ६६.११उस्मानाबाद ६६.९७ बीड ६२.०८एकूण- ६१

टॅग्स :ElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडा