मतमोजणी परिसर प्रतिबंधित

By Admin | Updated: May 11, 2014 00:37 IST2014-05-11T00:16:38+5:302014-05-11T00:37:40+5:30

हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे.

Counting of votes counted | मतमोजणी परिसर प्रतिबंधित

मतमोजणी परिसर प्रतिबंधित

 हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या इमारतीतील स्ट्रॉगरूमच्या २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक १७ एप्रिल रोजी शांततेत पार पडली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशीन हिंगोलीच्या एमआयडीसी भागातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या कालावधीमध्ये मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात जमाव बंदी तसेच मोबाईल फोन,कॉडलेस फोन, पेजर, व्हीडीओ कॅमेरा, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन, स्फोटक-घातक पदार्थ नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या इमारतीतील स्ट्रॉगरूमच्या २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. तसेच प्रतिबंधात्मक आदेश निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना व निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांना लागू राहणार नाही. सदरील आदेश १६ मे सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहील. सदरील आदेश प्रत्येक व्यक्तीवर तामील करणे शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश ध्वनिक्षेपकाद्वारे पोलिसांनी जाहीर करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. लोकसभा क्षेत्रातील वसमत, हिंगोली, कळमनुरी, हादगाव, किनवट, उमरखेड या मतदारसंघातील इलेक्टॉनिक वोटिंग मशीन्स हिंगोली येथे स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Counting of votes counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.