चारशे कर्मचार्यांना मतमोजणी प्रशिक्षण
By Admin | Updated: May 11, 2014 00:11 IST2014-05-11T00:07:46+5:302014-05-11T00:11:51+5:30
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी चारशे कर्मचार्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले

चारशे कर्मचार्यांना मतमोजणी प्रशिक्षण
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी चारशे कर्मचार्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. मतदान यंत्र कसे हाताळायचे, मतदानाचे फॉर्म कसे भरायचे आदींची माहिती या प्रशिक्षणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विक्रम कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी आदींनी हे प्रशिक्षण दिले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १६ मे रोजी शेंद्रा एमआयडीसीतील बी-२२ येथे होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून ही मोजणी ८४ टेबलवर होणार आहे. त्यासाठी एकूण ४१० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व कर्मचार्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता प्रशिक्षण कार्यक्रमाला सुुरुवात झाली. यावेळी मोजणी कर्मचार्यांबरोबरच निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बुधवारी रंगीत तालीम मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिल्यानंतर आता प्रत्यक्ष मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. ही तालीम बुधवार, दि. १४ मे रोजी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील बी-२२ येथे होणार आहे.