पोलीस बंदोबस्तात बिबी का मकबऱ्याच्या जागेची मोजणी
By संतोष हिरेमठ | Updated: July 27, 2022 17:59 IST2022-07-27T17:56:04+5:302022-07-27T17:59:28+5:30
७१ वर्षांनंतर बिबी का मकबऱ्याच्या पीआर कार्डवर भारतीय पुरातत्त्व विभागाचे नाव आले आहे

पोलीस बंदोबस्तात बिबी का मकबऱ्याच्या जागेची मोजणी
औरंगाबाद : नगर भूमापन कार्यालयातर्फे बिबी का मकबऱ्याच्या जागेची मोजणी आणि मार्किंग सुरू करण्यात आली; परंतु काही जणांकडून या मोजणीला विरोध केला करण्यात येत आहे. त्यामुळे ही मोजणी अर्ध्यातच थांबविण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच आता पुढील मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोजणी पूर्ण करण्यात आली.
जवळपास ७१ वर्षांनंतर बिबी का मकबऱ्याच्या पीआर कार्डवर भारतीय पुरातत्त्व विभागाचे नाव लागले आहे. बिबी का मकबऱ्याच्या नावावर ८४ एकर जमीन आहे. ही मोजणी पूर्ण होताच अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अतिक्रमण करणाऱ्यांकडून मोजणीला विरोध होत असल्याचे सांगितले जात होते. मोजणी करताना मोठा जमाव जमला होता. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.