पाण्याच्या टाकीवर नगरसेवकांनी मांडला ठिय्या
By Admin | Updated: January 12, 2016 00:06 IST2016-01-12T00:01:17+5:302016-01-12T00:06:25+5:30
औरंगाबाद : शटडाऊनमुळे आधीच पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असताना वॉटर युटिलिटी कंपनीने सोमवारी पुन्हा सिडको एन-७ मध्ये व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले.

पाण्याच्या टाकीवर नगरसेवकांनी मांडला ठिय्या
औरंगाबाद : शटडाऊनमुळे आधीच पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असताना वॉटर युटिलिटी कंपनीने सोमवारी पुन्हा सिडको एन-७ मध्ये व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे हडकोतील अनेक वसाहतींना सहाव्या दिवशीही पाणी मिळू शकले नाही. परिणामी संतप्त झालेल्या काही नगरसेवकांनी जलकुंभावर येऊन ठिय्या दिला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम संपल्यावर जलकुंभावरून एकेका वसाहतीला पाणी देण्यास सुरुवात झाली.
शहरात चार-पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी कंपनीने शनिवारी दिवसभर जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. पाच दिवसांच्या खंडानंतर हडकोतील एन-९, एन-११, यादवनगर, श्रीकृष्णनगर, मयूर पार्क, पवननगर, जाधववाडी आदी वसाहतींना आज पाणीपुरवठा होणार होता; परंतु कंपनीने सिडको एन-७ येथील जलकुंभाजवळ व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे आज सकाळीही या वसाहतींना पाणी
विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे पुंडलिकनगरातील महिलांनी सोमवारी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. नगरसेविका मीना गायके यांनी गांधीगिरी करीत अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले दिली. शिष्टमंडळाने कंपनीचे व्यवस्थापक सोनल खुराणा यांना निवेदन दिले. चार गल्ल्यांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. तेथील पाईपलाईन जुनी झाल्यामुळे कमी दाबाने पाणी येते. मागील सहा दिवसांपासून तर या गल्ल्यांना एकदाही पाणी मिळालेले नाही.